Tuesday, November 11, 2014

भिजू घातलेली स्वप्नं


रात्रभर डोळ्यात
भिजू घातलेली "स्वप्नं"
दुसऱ्या दिवशी पहाटे
कोणीही ऊठण्याआधी
काढून... पिळून...
काळजात वाळत घालतो..
मग सुरु होतो दिवस..
पण असंच कधीतरी..
राहतात काही तशीच
डोळ्यात... भिजत..
अन मग एखाद्या
छोट्याशा धक्यानंही
ओघळ येतात गालावर
नजर चुकवत
कसनुसं हसून
टिपायचे मग पटकन
दुसऱ्या दिवशी मात्र
न चुकता.. पहिल्यांदा
विल्हेवाट लावायची त्यांची
असंच चालत आलंय आजवर
तरीही अजून बिनघोर
डुंबतात ती डोळ्यात रातभर
आता मात्र कठिण वाटतंय सगळं
कारण संपत आलंय आता दोन्ही...
स्वप्न सुकवायची काळजातली जागा
अन
भिजू घालायला लागणारं डोळ्यातलं पाणीही


के पी आर
(काल परवा पर्यंत बोलके वाटणारे डोळे
आज मात्र निर्जीव वाटतात तुम्हाला... हं.. चालायचंच)

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.


एखाद्या खूप महत्वाच्या प्रवासाला निघताना जसं बॅग पॅक करताना गोंधळ उडलेला असतो तसंच काहीसं नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर होतंय.
काय काय सोबत न्यायचं, काय नाही, काही गोष्टी अशा असतात की पूर्ण सोडून जाता येत नाही, काही हव्या असतात पण सोबत नेता येत नाहीत तसंच अगदी तसंच आज झालंय.
मग मीही विचार केला की नव्या वर्षात सरत्या वर्षातलं काय काय घेऊन जायचं अन काय मागे सोडायचं?
विश्वासघात, कटू आठवणी, भांडणं, गैरसमज, नाराजी - कितीही अन काहीही केलं तरी डोक्यातून जाईनात. म्हणजे जे सामान पूर्णपणे मागे सोडून जाता येत नाही त्यातलंच हे. मग ठरवलं हे सोबत तर न्यायचं नाहीये पण सोडता सोडवतंही नाहीये तर काय करावं. म्हटलं ठिके सोडूया मागे पण यातून मिळालेला धडा, अनुभव अन शहाणपण नव्या वर्षात नक्कीच घेऊन जायचं ते मागे नाही सोडायचं.
दोस्ती, प्रेम, कष्ट, जिद्द, माया, जिव्हाळा, घरच्यांचे आशिर्वाद - हे तर आपसूकंच आतूर आहे माझ्यासोबत नव्या वर्षात येयला, हे तर घेऊन जायलाच हवं.
सगळ्याच गोष्टी आपल्याकडे नसतात प्रवासाला निघताना म्हणूनंच आपण ठरवतो कि तिकडे पोहोचल्यावर तिथेच घेऊ नव्यानं. तसंच काहीसं नव्या वर्षात उत्तरोत्तर अन नवी कोरी प्रगती करायची, आहे यापेक्षा तब्येत ऊत्तम करायची, मागल्या वर्षात न सापडलेल्या प्रश्नांची ऊत्तरं शोधायची, जुनी स्वप्नं तर जोपायसाचीच पण नव्यानं सुद्धा बघायची, नवी ऊमेद, नवा जोश, धमाल मस्ती धिंगाणा... अन जे जे काही या वर्षात जमलं नाही ते नव्या वर्षात नव्यानं का असेना हवंच ना यार.
अन पुढल्या वर्षी असं काही करु की ते वर्ष सरताना मनाविरुद्ध काही मागे सोडून जावं लागणार नाही किंवा मनाविरुद्धंच पुढेही घेऊन जावं लागणार नाही.

चला तर मग, निघूया..

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

के पी आर आणि परिवार

औंदा आमचंबी लगीन झालेलं हाय..



बगितल्या किती..
घेतल्या भेटी गाटी..
कदी उताने पडले ग्रह तारे
कदी उगाच झाली माती..
पन त्ये म्हनत्यात ना
येळ आली की
जुळत्यात बिन बोभाट नाती
आमी बी त्येला अपवाद न्हाय
करायचं करायचं म्हनताना
औंदा आमचंबी लगीन झालेलं हाय..

दुनिया फिर्लो
पन हितंच हुती ती
लै म्होरचं बगताना
बाजूचं दिसतंच नवतं जी
धावपळ येरझाऱ्या
वधू-वर सूचक मंडळाचा बी झाल्या फेऱ्या
पन कशाचा म्हून उपेग झालाच न्हाय
अन तरी बी कुनास ठाऊक कसं
पन औंदा माजं बी लगीन झालेलं हाय...

माय न बा तर कावले हुते लै
माजंबी डोस्कं ठिकान्यावर नवतं तेच्यापायी.
पन मांडवात मातुर आपन रुबाब केला लै
च्यामायला येकदमंच खुश झाले
माय बा ताई आन माई
ए दुनियाचं भारी समदं
हातचं काय बी राखून ठिवलं न्हाय
मायला कसं हुईल कवा हुईल
ईचार करता करता
औंदा आप्ल बी लगीन झालेलं हाय.

कवा पुळका एका मेराचा
कवा कुरकुर अशीच ऊगी
कवा करपलेल्या रानावानी
तर कवा मनाजोगती सुगी
कवा रुसुन फुगलेले गाल
समजवता समजवता माजे बी हाल
कवा ऊन कवा पाऊस
कवा कंटाळा लै कवा दुनयाची हौस
तिचं थोडं माजं थोडं
कवा तानायची भांडनं
कवा सोडून चालायचं फुडं
काल परवाची गोश्ट वाटतीया
पन वरीसभरात रांकेला लागलं बगा गाडं
टेंपरवरीच आसतीया नाराजी
पिरेम अस्तंय लै...
समदं जुळवूनं घेतो मंग तेच्यापाई
आता समजून घ्या लकांनो
समदंच सांगता येत न्हाय...
वरीस सरलं गड्यांनो
औंदा लगीन झालेलं हाय

के पी आर

प्रेमापोटी


एकीनं मांडले हिशेब
पगार पाण्याचे, नोकरी धंद्याचे
घरा दाराचे, जवाबदारीचे
देश विदेशाचे अन कशा कशाचे..
अन एक म्हणाली
माझ तुझ्यावर आहे प्रेम...
पहिल्यापासून आजपर्यंत आहे सेम टू सेम

एक म्हणाली तू झालास नापास
कधी कॉलेजात, कधी आयुष्यात
कधी कमवण्यात कधी जमवण्यात
कधी आईसमोर, कधी खोटा कधी खरोखर
एक म्हणाली मी ईथेच आहे रे
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्याबरोबर

एकीनं ठेवल्या अटी
वागण्या-बोलण्याच्या, खाण्या-पिण्याच्या
उठण्या-बसण्याच्या, हसण्या-रुसण्याच्या
असण्या-नसण्याच्या, दिसण्या-बिसण्याच्या
एक म्हणाली मला हवास फक्त तू असा
अगदी आहेस तसाच्या तसा

आणि तरीही
एकीनं... मला नाकारलं अन
एकीनं स्वीकारलं

च्यायला मीच म्हणालो मग
कसं जमवलंस गं? आहेस मनानं खरंच मोठी
तर म्हणते कशी...
जमतं रे सगळंच, जेव्हा करतो ना आपणं "हे" प्रेमापोटी...

के पी आर

तेरी... परछाईया


दिन ढलते ढलते
सूरज दिवाना होए
शाम की चादर तले
फिर तनहा ही वोह सोए
चाँदनी भी करे मेहसूस
उसकी तनहाईया
दिल छूता है छूता है
तेरी परछाईया

घने बादलो के पीछे
छुपती है कभी बारीश
मूँदी आँखो मे भी
गिली गिली सी ख्वाहिश
यादे सुनाती है
फिर तेरी कहानिया
दिल छूता है छूता है
तेरी परछाईया

न दिन न रात
न रोशनी न अंधेरा
साथ देता है तो
सिर्फ साया ही तेरा
अपना तो खैर खो गया कही
बीती सदिया, मै अब भी हू वही
वोही राह वोही मोड
भूल चुका हू लेकीन वोह गलिया
भीड मे भी अकेलापन है...
कानो मे गूँजती है खामोशिया
अब भी दिल करता है नाकाम कोशिश...
छूता है, छूता है, तेरी... परछाईया

के.पी. आर.

रात के आसमान पे
दस्तक चाँद की
ठंडी हवा ने लिखी नज्म
बादलो के नाम की
भूले भटके
बरसते बादल
चाँदनी के आँखो मे
अफक का काजल
येह जादू है मौसम का
या सपना कोई
रुह को छू के
दिल मे बस गया अपना कोई
.
.
.
.
.
.
बस अब जिद न करना
आँखे खोलने की...
बोल तो दिया आँखो से...
अब क्या जरुरत, लब्जो से बोलने की??

के पी आर

तुझे डोळे


झोपायचा प्रयत्न करत असतो मी... उगाच
कुस बदलून होते...
लाईट चालू बंद करुन होते
मग बसतो उठून
आरशात बघतो उगाच हसून
मोबाईलमधले मेसेजेस..
लॅपटॉपवरचे फोटो
जुने चाट्‌स..
तोंडपाठ झालेल्या गोष्टी
करुन, बघून होतात... कित्येकदा..
पण... झोप लागत नाही
अन मग उलटे आकडे मोजायला सुरुवात करतो
१०० पासून...
मधेच कुठपर्यंत आलो हे विसरतो
मग परत सुरुवात नव्यानं
मोठ्या प्रयत्नानं लक्षात ठेऊन
मोजत राहतो आकडे...
कसबसं ९० पर्यंत आल्यावर...
आठवतात तुझे डोळे...
अन मग विसरतो... "बाकी सगळंच"


के.पी. आर.
(च्यायला विषय ईथेच संपतो... बाकी काहीही लक्षात ठेवण्याचा)

बदलतंय आयुष्य


बदलतंय आयुष्य, कुणास ठाऊक कसं
हसतंय ही पाहून माझ्याकडे, अगदी कसंनुसं
पण.. नकोय हे असं.. कसंतरी.. काहीतरी..
च्यायला चुकतंय, नक्कीच चुकतंय कुठतरी
प्रश्नामागून प्रश्न, प्रश्नाचं उत्तरंही प्रश्न
प्रश्नातंच गुदमरलंय माझंही असणं
गुंत्याचा गुंता अजूनंच वाढतोय
च्यायला सुटणाऱ्या गाठीही
कसं न कोण तोडतोय?
चाललंय असंच नुसतं
मागच्या पानावरुन पुढं
विचारु नका कुणीकडून कुणीकडं
जमत नाहीये, "नाहीच" एवढं मात्र नक्की
पण काय??? कधी होणार याची खात्री पक्की
ना संदर्भ ना स्पष्टीकरण
ना जागा रिकाम्या कुठल्या
ना कुठलं कारण
कशाचंच नाही उत्तर कसलं
खरं अन खोटं
राहीलंय... उरलंय...
भरलंय अन कोरलंय
एक प्रश्नचिन्ह तेवढं "मोठं"

कुठं??? हं... ???

के पी आर

हंड्या


आज लागतील थर
होईल गर्दी
फुटतील हंड्या
बरसेल पाऊस... "पैशाचा"
डि.जे., चिकण्या होरोईन
बिनडोक हिरो
फ्लेक्सवर झळकतील
विशेष आकर्षण असतील तेच...
रंगतील बातम्या...
मेडिया, चॅनेल, न्यूजपेपर
जवाबदारी निभावतील... गल्ला भरण्याची
अन वर्तमानपत्राच्या प्रमुख पानावरुन
आतल्या पानात
आणि
ठळक बातम्यातून पुसट होत...
हद्दपार होतील
शहिद झालेले जवान
बलात्कार पिडीत महिला
अंधळ्यांसाठी जीव गमावलेले "दाभोळकर"
उत्तराखंडात वाहून गेलेले जीव
उंच उंच थरावरुन
तोल जाऊन घसरुन
मरतील काही ठिकाणी
काही ठिकाणी होतील जायबंदी
इंशुरन्सची रक्कम दाबेल त्याही बातमीला
खड्यात हरवलेले रस्ते
सर्वसामान्यांबद्दल पुळका असणारे
तथाकथित लोकमान्य "पुढारी"
डॉलरच्या चढावरुन
घरंगळणारा रुपया
गडगडणारा शेयर बाजार
मागच्या दारातून येता येता
घरात ठाण मांडून बसलेली "महागाई"

एकेका थरासोबत पुसल्या जातील आठवणी
काही मूर्ख मात्र माझ्यासारखे बसतील उगाळत
कोळसा... पांढरा होण्याच्या आशेनं

के.पी. आर

(कुठल्याही उत्सवाला नाही तर देश अडचणीत असताना उत्सवाच्या बाजारीकरण करण्याला विरोध नक्कीच आहे)

खपली


तू ज्याला ठेचकाळलास
त्याच दगडावर बसतं ना अजून कोणीतरी
"हात रे" म्हणत फसवायचे लाहानपणी
कुठे बदललंय काही आतातरी?

वाच्यता नको त्यागाची
सोड, सोडलंस ना काहीतरी त्यांच्यासाठी
नको ठेऊस अपेक्षा मनी
अन नकोच बघ ओठी

लाथाडलं तुला ज्यानी
नतमस्तक होतील त्याच्याचपाशी
मस्तक त्यांचं निर्णय त्यांचा
उगी भांडू नको भावनांशी

दगडाला तो जीव का लावा
मग कसली माया आपुलकी
संपला अध्याय केव्हाच मित्रा
घे धडा, आता जरा बदल की

काढून टाकलं ना आयुष्यातून
तांदळातल्या खड्यापरी
नकोच ठेऊ मनातही, नकोत शक्यता
जरी तरी...

के पी आर

(किती जरी जपली
असली जरी आपली
काढायची नाहीच
भूतकाळावरची खपली)

माणूस होऊ शकलो नाही


होश आम्हाला नव्हता कधीच
दोष स्वतःचा दिसला नाही
बोट दाखवलं चंद्राकडेही
डाग काळजाचा पुसला नाही

तोकडे दिसले कपडे तिचे
मन मोठ केल नाही
चाळवल्या भावना नेहमीच
अंतरातल्या जनावराला अंतरातंच मारलं नाही

दिसेल ते ओरबाडलं आम्ही
संमती कुणाची मागितली नाही
डोळ्यांनीच नागवलं तिला
"आई बहिण लेक" वय कुणाचं बघितलं नाही

पुरुषार्थ गाजवला जबरदस्तीनं
लाज कशाचीच वाटली नाही
चिंध्या चिंध्या केल्या तिच्या
वासना उरातली मिटली नाही

भोगायची वस्तू भोगली फक्त
आवर स्वतःला घातला नाही
पिळल्या मिशा फुगवली छाती
बाईपुढं नमणं जमलंच नाही

आदर मान खातात कशाशी
आजवर कधी शिकलोच नाही
जनावरं बरी आमच्यापरीस
आयुष्यात माणूस होऊ शकलो नाही.


के पी आर
(तू "पुरुष" आहेस असं ऐकून स्वतःची लाज वाटावी अशी वेळ आणू नका रे)

ती फुलतेय फुलासारखी
शिका थोडं जपायलाही
सात जन्म कमी पडतील
"स्त्री" खरी समजायलाही...

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...