Tuesday, November 11, 2014

प्रेमापोटी


एकीनं मांडले हिशेब
पगार पाण्याचे, नोकरी धंद्याचे
घरा दाराचे, जवाबदारीचे
देश विदेशाचे अन कशा कशाचे..
अन एक म्हणाली
माझ तुझ्यावर आहे प्रेम...
पहिल्यापासून आजपर्यंत आहे सेम टू सेम

एक म्हणाली तू झालास नापास
कधी कॉलेजात, कधी आयुष्यात
कधी कमवण्यात कधी जमवण्यात
कधी आईसमोर, कधी खोटा कधी खरोखर
एक म्हणाली मी ईथेच आहे रे
अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्याबरोबर

एकीनं ठेवल्या अटी
वागण्या-बोलण्याच्या, खाण्या-पिण्याच्या
उठण्या-बसण्याच्या, हसण्या-रुसण्याच्या
असण्या-नसण्याच्या, दिसण्या-बिसण्याच्या
एक म्हणाली मला हवास फक्त तू असा
अगदी आहेस तसाच्या तसा

आणि तरीही
एकीनं... मला नाकारलं अन
एकीनं स्वीकारलं

च्यायला मीच म्हणालो मग
कसं जमवलंस गं? आहेस मनानं खरंच मोठी
तर म्हणते कशी...
जमतं रे सगळंच, जेव्हा करतो ना आपणं "हे" प्रेमापोटी...

के पी आर

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...