माझ्याबद्दल थोडसं

माझ्याकडे सगळी उत्तरं होती म्हणून मी लिहायला सुरुवात केली नाही

डोक्यात खूप प्रश्न आणि गोंधळ असतो... जे शांत बसू देत नाहीत.



दिवसभर कामात numbers, business, negotiations, prospects

अशा सगळ्या काटेकोर चौकटीच्या जगात गुंतलेलो असतो.



डोक्यात रात्री कोणती तरी कथा कविता लिहायचे विचार घोळत असतात

या दोन जगांच्या मधली जागा म्हणजे हा ब्लॉग



बऱ्याचदा इथे लॉजिकला जागा नाही, इथे मी इमोशनल फूल वाटू शकतो, मोकळेपणानं बोलू लिहू शकतो.

जरा स्वैर, कधी ईललॉजिकल, कधी एक्स्ट्रीम.


काही गोष्टी लगेच समजतील, काही विचार करायला लावतील,

आणि काही वाचून तुम्हाला वाटेल — “हा नक्की काय विचार करत होता?”

मलाही कधी कधी असे प्रश्न पडतात... माझ्याबद्दलही




जर तुम्ही इथे perfection शोधत असाल, तर सापडणार नाही.

थोडं प्रामाणिक, थोडं उपहासात्मक, जरासं गोंधळलेलं, विखुरलेलं, अपूर्ण



असं काहीसं चालत असेल, पटत असेल –

तर कदाचित तुम्ही इथे थोडा जास्त वेळ रेंगाळाल.










No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...