Showing posts with label 'काय करतोय मी?'. Show all posts
Showing posts with label 'काय करतोय मी?'. Show all posts

Friday, July 13, 2007

'काय करतोय मी?'


'काय करतोय मी?'

ना जगतोय ना मरतोय मी.

जीवनात हे नक्की काय करतोय मी.

आला दिवस फक्त भरून काढतोय मी.

सत्य परीस्थितीला सामोरं जायला का डरतोय मी.

उघड्या डोळ्यानंच जणू स्वप्नरंजन करतोय मी.

जीवनांत हे नक्की काय करतोय मी?

हाती घेतलेल्या प्रत्येक कामात हरतोय मी.

गेला काळ कवटाळून का धरतोय मी.

नियतीशी भांडतोय नि रक्ताचे अश्रू का सांडतोय मी.

जीवनांत हे नक्की काय करतोय मी?

आशा नि निराशेच्या खेळात निराशेचीच कास का धरतोय मी.

दैवापुढे शरणागती पत्करून लढायचं का विसरतोय मी.

दिवसेंदिवस अपयशाच्या गर्तेतंच का घसरतोय मी.

जीवनांत हे नक्की काय करतोय मी?

आज ना ऊद्या हे ही दिवस सरतील या आशेवरंच तग धरतोय मी.

खरंच कायमस्वरुपी काहीच नसतं, पण जीवनांत येऊ घातलेला तो सोनेरी दिवस बघण्यासाठीच जगतोय मी आणि त्यासाठीच सर्वार्थाने लढतोय मी !

जीवनांत हे नक्की काय करतोय मी?जीवनांत हे नक्की काय करतोय मी?
कुणाल.

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...