Sunday, May 29, 2011

माहीत नाही...





क्लायमेट चेंज झालं...
आभाळ भरुन आलं..
पण..
आकाश मोकळं व्हायला किती दिवस लागले
अजून पाऊस पडतोय..
अजूनंही धरतीवर प्रेमाची बरसात करतोय...
कधी थांबेल माहीत नाही..
आपल्या हातात काहीच नाही..
पाऊस थोडासा भिजवून जाईल
कि... पावसात सगळंच वाहून जाईल
काय होणार काहीच माहीत नाही...
एवढंच माहितीए..
तो बरसतोय त्याच्या प्रेमापोटी
अन मी भरलेले असूनंही रित्या डोळ्यानं बघतोय...
आश्चर्य वाटत असेल तुला...
माझ्या रित्या डोळ्यांचं
माझ्या कोत्या मनाचं..
शांत कसा मी एवढ्या वादळात?
अगं वीजा चमकतात माझ्याही काळजात..
अजूनंही डोळे माझे बरसतात..
अजूनंही...
काळजाच्या धरतीवर सारं रितं करतात..
पण..खरंच माहीत नाही
पाऊस कधी थांबणार..?
काळ्जातली दरी कधी सांधणार?
कधी कधी प्रश्नांची उत्तरं प्रश्नातंच असतात नाही?
तरीही म्हणतोय आपण काहीच माहीत नाही...
एक मात्र माहीतीए... पावसाला, धरतीला, वादळाला, आसमानाला
अन माहीतीये सगळ्यांना...

"आय लव्ह यू"...

पण तुला माहितीये कि नाही... माहीत नाही...

कुणाल

Sunday, May 15, 2011

राहू दे अशीच मला...




असंच राहू दे सारं.. असंच वाहू दे वारं..
वाऱ्याबरोबर फिरवलीस पाठ तरी मनात राहू दे सारं
असंच राहू दे..
वहित दबलेलं फूल श्वासात सुकलेली कळी
ओठावरचं हसू अन गालावरची खली
माझ्या काळजातला तुझा ठोका, वेड्या वयातल्या वेड्या चूका
वाट पाहणारे दोन डोळे, भावनांचेते खेळ खुळे
भेटण्याची ठिकाणं, येण्याजाण्याच्या वाटा
किनाऱ्याला येऊन विसावलेल्या लाटा
तो सागरी किनारा अन चांदरात
वाळूवर नक्षी कोरणारे हात
कातरवेळ अन आभाळाची लाली
परतीचे वेध अन हळूच निसटणारा सूर्य डोंगराखाली
चिंब भिजवणाऱ्या पावसाच्या धारा
जवळ आणणारा गार वारा
धमाल मस्तीचे दिवस अन बाईकवरच्या फेऱ्या
साठवलेली सिनेमाची तिकिटं अन दुर्गा कॅफेच्या वाऱ्या
कॉलेज कॅंटीन कट्टा अन आपला शेवटचा बाक
फुगवलेले गाल अन नाकाच्या शेंड्यावरचा लटका राग
मेल्स, मेसेजेस अन माझ्यासाठी केलेल्या कविता
सारं काही मनाच्या कागदावर उतरवून ठेव आता
विरहाचं दुःख, भेटल्याचा आनंद
निरोपाची वेळ अन तुटणारे बंध
बेसूर आवाजात गायलेली गाणी
हसताना पापण्याच्या कड्यात लपवलेलं पाणी
अन.. अन..
काळजाच्या कोपऱ्यात जपलेल्या आठवणी..
सारं काही राहू दे तस्सच्या तस्स..
विसरायचं का अन विसरायचंही कसं?

पण आता..
पण आता देऊ नकोस दिल्या घेतल्या वचनाची शपथ सारखी सारखी
राहू दे मला अशीच.. अनोळखी अनोळखी..

तरीही तुझीच..

कुणाल.

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...