आपल्याला स्वातंत्र्य मिळालं; नव्हे,
मिळवलं. जीवाचं रानं करुन,
प्राणांची आहुती देऊन, घर
दार संसार सोडून,
जात-पात, धर्म,
ऊच्च नीच सगळे
भेदभाव सोडून, एकत्र लढून
मिळवलं. असंच नाही
मिळालं, खरंच मिळवलं.
स्वातंत्र्य कोण्या एका गटाची,
जातीची, धर्माची किंवा वर्गाची
मक्तेदारी नाही ते
प्रत्येक भारतीयाचं आहे, प्रत्येक
भारतीयाचा हक्क आहे.
स्वातंत्र्यानं आपल्याला काय दिलं?
एक सशक्त राज्यघटना
दिली, त्याच राज्यघटनेनं
व्यक्तिस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती
स्वातंत्र्य दिलं. पण स्वतंत्र
भारताच्या ६७ वर्षात
हे स्वातंत्र्य खरंच
आहे प्रत्येकाला?
अरे दोन वर्षाच्या
चिमुकलीपासून ते ७०
वर्षाच्या जख्ख म्हातारीपर्यंत,
प्रत्येकीकडे आपण फक्त
आणि फक्त आपली
वासना शमवण्याची साधनं
म्हणून बघू लागलोय.
तिला डोळ्यानंच नागवू
लागलोय. गर्दीत चोरटा स्पर्श
करताना, तिच्याकडे पाहून आचकट
विचकट हावभाव करताना,
विनयभंग आणि प्रसंगी
बलात्कारही करताना तिनं घातलेले
कपडे हे एक
कारण पुढे करतोय
आपण? हे स्वातंत्र्य
आहे??? तसेच कपडे
आपल्या आई, बहिण,
मुलीनी आत्या मावशीनी घातले
तर? त्यांच्याही कपड्यांच्या
आरपार बघणार का
आपण?
"मला असं वाटतं
कि मुलींनी किमान
अमुक तमुक प्रकारचे
कपडे घालावे, फलाणा
ढिमका ठिकाणी जाऊ
नये, ईतके तितके
वाजण्याआधी घरी यावं,
ह्यॅव अन त्यॅव
करावं" असं सर्रास
ऐकायला मिळतं. अरे पण
त्यांनी कसे कपडे
घालावे, त्यांनी काय करावं,
कुठे जावं हे
ठरवणारे आपण कोण.
त्यांनी काहीही केलं, कसलेही
कपडे घातले तरीही
मी माणसासारखंच वागणार,
जनावर होणार नाही
ईतकी साधी गोष्ट
नाही ठरवू शकत
आपण?
माझ्यापुढे
सिग्नलला थांबलेल्या माणसाला हॉर्न
वाजवून वाजवून हैराण करणार,
का? तर लाल
दिवा असताना माझी
थांबायची तयारी नाही, वाह.
म्हणून पुढच्यानंही नियम मोडायचा.
तो अतिशहाणा तसाच
थांबून राहिला तर एखाद
दुसरी शिवी हासडणार
मी, दमदाटी करणार,
झालंच तर बाचाबाचीही
करणार अन त्याहूनंही
नाही ऐकलं तर
हातही चालवणार. हे
सगळं कशासाठी? तर
त्या अतिशहाण्यानं त्याच्या
वागण्यातून मला शहाणपणा
शिकवायचा प्रयत्न केला म्हणून?
तुझा भा.ज.प. ला
पाठिंबा आहे तर
तू कट्टरपंथी, बाकीच्या
धर्माचा आदर न
करणारा. तुझा काँग्रेसला
पाठिंबा आहे तर
तू आंधळा, भ्रष्टाचाराला
चालना देणारा. तुझा
आप ला पाठिंबा
आहे तर तू
बिनडोक, तुला काहीच
कळत नाही. अमुक
एका पत्रकारानं तमुकचं
कौतुक केलं अजून
कोणी एकानं कोण्या
एकावर टिका केली
तर विकलं गेलंय
मेडिया. तू गे
आहेस तर तू
गुन्हेगार आहेस, तू चळवळीतून
आलास तर तू
अराजकतावादी आहेस. तू अमुक
आहेस तर असा,
तमुक आहेस तर
तसा. मीच ठरवणार
तू कसा अन
मी कसा.
माझी जात ऊच्च,
माझा धर्म श्रेष्ठ,
माझं म्हणणं बरोबर,
तुझं वागणं चूक.
अमुक एका गोष्टीनं
माझ्या डोक्यात सणक जाते,
माथा तर आमचा
कायमंच भडकलेला असतो. मग
तोल जातो माझा,
अर्वाच्च भाषेत टिका, हातात
लाठ्याकाठ्या, दगड, तोडफोड,
जाळपोळ, विटंबना, नुकसान पण
सगळं दुसऱ्याच्या मालमत्तेचं.
माथा भडकल्यावर कोणी
स्वतःच्या घरी जाऊन
तोडफोड, जाळपोळ बरी करत
नाही, घरच्यांची डोकी
बरी फोडत नाही?
असं करु नये
एवढं कळण्याईतपत डोकं
ठिकाणावर असतं. माथा भडकतो
तो फक्त ऊरलेल्या
भारतीयांवर.
मला तू आवडत
नाहीस तर मी
तुझ्यावर टिका करणार,
जाहीर टिका करणार,
अर्वाच्च अश्लाघ्य भाषेत करणार.
सोशल मेडियावर मजकूर
टाकणार. कधी संघिष्ठ,
खाकी चड्डी, काळी
टोपी अन हातातल्या
काठीवरुन बोलणार. कधी बामण,
कधी महार कधी
मुसलमान आहेस म्हणून
तर कधी रंगावरुन
दिसण्यावरुन हिनवणार. तू चिड,
चरफड, दमून हरुन
जा, आत्महत्या कर,
मर तिकडे पण
मी नाही थांबणार.
माझ्या मनाविरुद्ध असेल तर
तुझं वागणं चूक,
बोलणं चूक, भावना
चूक, कपडे घालणं
चूक, नियम पाळणं
चूक, प्रेम करणं
चूक, मतप्रदर्शन चूक,
आवड चूक, निवड
चूक, तुझं असणं
चूक, तुझं दिसणं
चूक, तुझं जगणंही
चूक. माझ्या मनासारखं
असेल ते सगळं
बरोबर आणि मनाविरुद्ध
असेल ते सगळं
सगळं चूक.
स्वातंत्र्य
फक्त मलाच, माझ्याच
विचारांना, माझ्याच कृतीला, माझ्याच
स्वैराचाराला. मी, मी
आणि फक्त मी...
स्वातंत्र्य
मिळालं आपल्याला ६६ वर्षांपूर्वी
पण त्या स्वातंत्र्याचा
वेगळाच अर्थ घेतला
आपण. स्वातंत्र्य फक्त
माझ्यापुरतं, बाकीच्यांचं काय? बाकी
माझेच गुलाम?
दुसऱ्याची जात, धर्म,
रंग, मतं, विचार...
दुसऱ्याचा आदर करायला
शिकू तेव्हाच खरं
स्वतंत्र्य होऊ.
आता मात्र या मी
माझाच्या जयघोषात कळलंच नाही
आपल्याला आपण कधी
अतिरेकी झालो ते..
खरंच आपण अतिरेकी
झालोय.
के.पी. आर
.jpg)