बगितल्या किती..
घेतल्या भेटी गाटी..
कदी उताने पडले ग्रह तारे
कदी उगाच झाली माती..
पन त्ये म्हनत्यात ना
येळ आली की
जुळत्यात बिन बोभाट नाती
आमी बी त्येला अपवाद न्हाय
करायचं करायचं म्हनताना
औंदा आमचंबी लगीन झालेलं हाय..
दुनिया फिर्लो
पन हितंच हुती ती
लै म्होरचं बगताना
बाजूचं दिसतंच नवतं जी
धावपळ येरझाऱ्या
वधू-वर सूचक मंडळाचा बी झाल्या फेऱ्या
पन कशाचा म्हून उपेग झालाच न्हाय
अन तरी बी कुनास ठाऊक कसं
पन औंदा माजं बी लगीन झालेलं हाय...
माय न बा तर कावले हुते लै
माजंबी डोस्कं ठिकान्यावर नवतं तेच्यापायी.
पन मांडवात मातुर आपन रुबाब केला लै
च्यामायला येकदमंच खुश झाले
माय बा ताई आन माई
ए दुनियाचं भारी समदं
हातचं काय बी राखून ठिवलं न्हाय
मायला कसं हुईल कवा हुईल
ईचार करता करता
औंदा आप्ल बी लगीन झालेलं हाय.
कवा पुळका एका मेराचा
कवा कुरकुर अशीच ऊगी
कवा करपलेल्या रानावानी
तर कवा मनाजोगती सुगी
कवा रुसुन फुगलेले गाल
समजवता समजवता माजे बी हाल
कवा ऊन कवा पाऊस
कवा कंटाळा लै कवा दुनयाची हौस
तिचं थोडं माजं थोडं
कवा तानायची भांडनं
कवा सोडून चालायचं फुडं
काल परवाची गोश्ट वाटतीया
पन वरीसभरात रांकेला लागलं बगा गाडं
टेंपरवरीच आसतीया नाराजी
पिरेम अस्तंय लै...
समदं जुळवूनं घेतो मंग तेच्यापाई
आता समजून घ्या लकांनो
समदंच सांगता येत न्हाय...
वरीस सरलं गड्यांनो
औंदा लगीन झालेलं हाय
के पी आर

No comments:
Post a Comment