मित्रांनो हे सगळं मजा मस्करीमधे लिहिलं आहे तरी कोणी कृपया वाचून मनात राग धरु नये आणि गैरसमज करुन घेऊ नये ही मनःपूर्वक विनंती. यामधे कोणालाही दुखवण्याचा किंवा त्रास देण्याचा हेतू नाही.. यारी दोस्तीत लिहिलंय गड्यांनो... तर भाऊड्याहो विश्लेषण जरा मोठंच आहे पण शेवटपर्यंत वाचा आणि नक्की सांगा कसं आहे ते.
आपल्या वॉट्स अॅप ग्रुपचं विश्लेषण (SCOE)
दिवाळीच्या सकाळी आपली एक रुढी म्हणून काहीजणं फटाके ऊडवतात. फटाके ऊडावणं फारसं आवडत नसलं तरी आपला प्रघात पडलाय म्हणून उडवतात. दोन-चार फटाके लावतात, वात पेटवल्यावर घाईघाईत लांब जाऊन ऊभे राहतात आणि दोन्ही हातांनी कान घट्ट दाबून धरतात. पाच दहा मिनिटामधे हा कार्यक्रम गुंडाळून निघून जातात. आपला प्रसाद उगले त्या प्रघात म्हणून फटाके ऊडवणाऱ्या माणसा सारखा आहे. रोज सकाळी ग्रुपवर येतो, दोन-चार मेसेजेस टाकतो आणि पसार होतो.
मित्रांनो जातीवाचक बोलण्याचा उद्देश नाहीये, कृपया कोणीही गैरसमज करुन घेऊ नका हि विनंती) मराठा मंडळींच्या लग्नपत्रिकेत नेहमी नावांची मोठी यादी असते. प्रेषक, कार्यवाहक, निमंत्रक, आमचे आदरस्थान वगैरे वगैरे. त्यात त्यांच्याशी काहीच संबंध नसलेल्या लोकांचीही भली मोठी यादी असते, म्हणजे निमंत्रक श्री. अमुक तमुक, भाजयुमो जिल्हाध्यक्ष, श्री. फलाना ढिमका विद्यमान आमदार, श्री हे ते माननीय नगरसेवक आणि कोण कोण. या लोकांना आयडीयाच नसते कि यांची नावं लग्नपत्रिकेत आहेत. छापणारे मात्र माननीयांना अजून मान द्यायचा म्हणून नावं छापत राहतात. तसेच आपले आनंद बखारे, सचिन सिनगारे, राहुल संघवी, शैलेश गाडवे, किरण चौधरी, विवेक दानेज, अमोल शिंदे, निलेश गोयल, रोहित जोशी, भुज्या.. हे आपले मित्र कळत नकळत आपल्या ग्रुपची शान वाढवतायेत पण यांची नावं आपल्या ग्रुपमधे छापलेली आहेत हि आयडिया तरी आहे का आपल्या मित्रांना?
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, कसा का खेळेना तो या पदावर कायम आहे. पाच पंचवीस मॅचेसमधे तो एखादी मॅच ब्यॅट आडवी तिडवी करत जोरजोरात रन्स करतो मग पुढच्या पाच पंचवीस मॅचेससाठी तो निवांत. टिममधे तर असतो, ग्राऊंडवरसुद्धा दिसतो पण टीममधे नसल्यागत खेळत(?) राहतो. तसाच आपला संघनायक अतुल कुलकर्णी अधून मधून ग्रुपमधे डोकावतो चार दोन मेसेज चिकटवतो आणि परत निवांत.
एका मुलाला लव्ह मॅरेज करायचं असतं, मुलीच्या घरचे काहीच बोलत नसतात. हा पोरगा उठसूट त्यांच्याकडे फेऱ्या मारत असतो, काही ना काही विषय काढत असतो, भरभरुन बोलतो. मनोरंजन करतो, अगदी पुढे पुढे करुन होतं मुलीच्या घरच्यांपुढे पण तिचे आई वडील चकार शब्द काढत नाहीत. त्याल वाटतं आता काही बोलतील, नंतर बोलतील पण ते गप्पच. ते काय बोलतायेत हे ऐकण्यासाठी कानांत जीव ओतून वाट बघत असतो तो आणि ते कधीतरी हळूच एखादं वाक्य बोलतात. याच्या आशा वाढतात, वाटतं अजून बोलतील, हुरुप वाढतो याचा अजून भरभरुन बोलू लागतो पण मग मुलीचे आई वडील परत गप्प बसतात ते गप्पच.. हा प्रार्थना करतो मनोमन की परत लवकर बोलावे, पण कुणास ठाऊक कधी बोलतील परत? तसे आपले इंद्रजीत आणि चिन्मय पंडित, यांच्या एखाद्या वाक्यासाठी आख्खा ग्रुप जीव काढतो आणि हे एखाद दुसरं वाक्य बोलून गायब. आख्खा ग्रुप त्या लग्नाळलेल्या मुलासारखं यांच्या एकाद्या वाक्यासाठी तरसतात आणि एका वाक्यानं खुश होतात तर हे लगेच गायब.
आपल्या कॉलेजला स्वारगेटवरुन ५४ नंबरची बस येयची. येण्याजाण्याचे टायमिंग्ज ठरलेले असायचे. आपल्या आखून दिलेल्या रुटवर ती बस शेड्यूलप्रमाणे अविरत चालायची, बसमधे पोरं येऊ न येऊ तिला फरक नाही पडायचा. ती आपली ठरलेल्या वेळेत येणारंच, आपलं काम चोख.. तसेच आपले ऋषिकेश गुळुंजकर आणि धिंग्या, हे दोघं रोज ईमानेईतबारे ग्रुपवर येणार म्हणजे येणार, मॉर्निंग गुड करणारे मेसेज टाकणारंच आणि न चुकता हि दिनचर्या पाळणारंच. एकवेळ आपली बस पुढे मागे झाली असेल पण हे दोघं एकदम रेग्युलर.
एखादी सिरीयल, पिक्चर, मॅच किंवा बातम्या चालू असतात. मधेच जाहीरात लागते, सिरीयल, पिक्चर किंवा बातम्यांचा विषय काय याच्याशी जाहीरातीचा काहीच संबंध नसतो. सिरियलमधे एखादीचा नवरा तिला सोडून गेलेला असतो आणि ब्रेक होतो जाहीरात लागते टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची.. हनीमून स्पेशल ऑफर.. पिक्चरमधे एखाद्या जोडप्याला मूल होत नसतं आणि तेवढ्यात ब्रेक होतो काँडोमची जाहीरात लागते आणि सांगतात अनचाहे गर्भसे बचिये... मॅच चालू असते, भारतीय टिमचे गडी धडाधडा आऊट होत असतात ब्रेक होतो आणि बच्चन नाचत गात म्हणतो कुछ मिठा हो जाए. त्या जाहीरातींना काही देणंघेणं नसतं मुख्य कार्यक्रमात काय चाल्लय.. पण अशावेळेस कधी कधी या जाहीराती खरंच मच नीडेड ब्रेक देतात.. हसवतात.. तसा आपला हा प्रतिक पत्की. तुम्ही चुत्त्यासारखी काहीही चर्चा करा हा अधून मधून येतो आणि सुपरमॅनच्या जोक्ससारखे झकास जोक्स टाकतो आणि जातो..
टिव्हीवर विविध विषयांवर चर्चासत्र, वादविवाद होतात. त्यामधे वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि राजकिय पक्षातले प्रतिनिधी सहभागी होतात. या पाहुण्यांमधे कॉमन असतात ते म्हणजे राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे जनार्दन चांदुरकर, मग विषय कोणता का असेना. त्यांना कोणत्याच विषयाचं वावडं नाही आणि शिवाय त्यांना सगळ्याच विषयाचं ज्ञानंही आहे. असे लोक खरतर दुर्मिळंच पण आपलं परमभाग्य म्हणून आपल्या ग्रुपमधे जितेंद्र आणि जनार्दन नंतर आपल्याला एक असा धडाडीचा नेता आणि अभ्यासू मित्र (पुष्कराज पाटील) पुष्क्याच्या रुपानं लाभलाय.
आपल्या मंडळात एखादा असा असतो जो सकाळी सकाळी येतो आणि म्हणतो पत्ते खेळू, पब्लिक तयार होतं. पत्ते आणतात, तीनपत्ती चालू होते, एकेकजण पैसे लावतो, काऊंटर वाढत जातं आणि शो जसाजसा जवळ येतो तेव्हा हा म्हणतो, "ए पत्ते बंद करा रे, सकाळी सकाळी पत्ते खेळणं वाईट.. किंबहुना कधीच जुगार खेळणं वाईट, पैसे लावणं हा सेन्सीटिव्ह ईश्यू आहे.. बंद करा". कोणी काही बोलण्याआधी मग तो म्हणतो पत्ते पिसायला मीच सुरुवात केली म्हणून मी माफी मागतो. सगळेजण त्याचं ऐकून खेळ बदलतात, हाही त्यांच्यासोबत खेळतो आणि सगळे गुंगलेले बघून तिथून काढता पाय घेतो आणि संध्याकाळी सगळे जाण्याआधी परत एकदा डोकावून जातो, जणू काही मी ईथेच होतो रे. तसा आपला बेल्या, ग्रुपवर येतो विषय बदलायला लावतो, बोलल्यासारखं करतो आणि सगळे रमले की गायब होतो.
दोन बोक्यांची लोण्यावरुन भांडणं चालू असतात, वाटप काही केल्या होत नसतं. तिथे माकड येतं, बोके मोठ्या आशेनं माकडाकडे बघतात, त्याला म्हणतात दादा आम्हाला वाद सोडवायला मदत कर. माकड सगळं ऐकून घेतं, लोणी कोणी आणलं, कोणी मदत केली.. कसं आणलं कोणाचं काँट्रीब्युशन जास्त वगैरे वगैरे आणि सगळं ऐकून झाल्यावर म्हणतो भोसडीच्यांनो लोण्यासाठी कसलं भांडता, खरंतर सगळ्यांसाठी खीर चांगली. अरे पण आमचं काय चाल्लंय, च्यायला आमच्याकडे लोणी आहे, मोठे कष्ट करुन चोरुन आणलंय आणि आयचा घो तू खीरीबद्दल काय बोलतोयेस? अरे चुत्त्यांनो खीर आणि पुरी बेश्टंच एकदम. अरे आमच्याकडे लोणी आहे रे दादू.. लोणी.. मगाशी खीर म्हणालास आता पुरी अॅड केलीस.. लोणी रे लोणी सगळे वैतागून सांगतात.. हा हसतो म्हणतो खीर पुरी आणि झालंच तर फ्रुट सॅलड लय भारी. आयच्या गावात रे लोण्याबद्दल बोल ना.. खीर पुरी फ्रुट सॅलड आऊट ऑफ क्वच्चन आहे बे... मग हा म्हणतो.. मँगो ज्युस झिंदाबाद.. तसा आपला गणेश सुतार तुम्ही कोणाहीबद्दल बोला त्याला ज्याला सपोर्ट करावं वाटेल (ईर्रीस्पेक्टीव्ह ऑफ पब्लिक ओपिनियन) त्यालाच तो सपोर्ट करणार मग बाकी बोके जाऊदे भोकात.
आपलं कॉलेज, ऑफिस कोणतीही संस्था असो, त्याचे अध्यक्ष, चेअरमन, ट्रस्टीज वगैरे महत्वाची लोकं रोजंच संस्थेच्या लोकांसमोर येत नाहीत पण ते असतात. ते आहेत यामुळे सगळ्यांना हुरुप असतो, मोटीवेशन असतं. वेगवेगळ्या ओकेजन्सला, कार्यक्रमांना, वाढदिवसाला ते आवर्जून हजेरी लावतात सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतात. लोक खुश होतात पुन्हा नव्या जोमानं पुढच्या कार्यक्रमापर्यंत सगळ्यात सहभागी होतात आणि चेअरमन वगैरे मोठ्या लोकांचं दर्शन परत नव्या कार्यक्रमातंच होतं. तसा आपला शंतनू मोघे, प्रत्येक वाढदिवसाला, सणासमारंभाला तो नक्की आवर्जून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि परत येतो नव्या ओकेजनला.
आख्ख्या शहरात मच्छर खूप होतात. मलेरीया, डेंग्यू बिंग्यू आजार पसरवतात. सगळीकडून बोंबाबोंब होते पार, मग लोकांवर ऊपकार केल्यासारखं म्युन्सिपालटी एका माणसाकडे धुराचं मशिन घेऊन पाठवते आणि प्रत्येक एरीयात धुर सोडत फिरवते. धुरवाल्याचं आगमन सगळे नोटीस करतात, लहान पोरं त्याच्या मागं है.. करत पळतात, तो त्याला अलॉट केलेल्या वेळेपर्यंत भकाभका धूर मारत राहतो आणि निघून जातो.. दर चार-दोन दिवसांनी धूरवाला येतो, लोकांना समाधान वाटतं, पोरं खुश होतात, हा भकाभका धूर ओकतो आणि निघून जातो तसा आपला कौट्या चार दोन दिवसांनी येतो भकाभका मेसेजेस ओकतो, धूरवाला जसा मागे पळणाऱ्या पोरांच्या अंगावर ओरडतो तसा हा एखाद्याला एखाद्या पोस्टवरुन ओरडतो आणि निघून जातो.
टिव्हीवर चर्चासत्र चालू असतं, रंगात आलेलं असतं. तेवढ्यात अँकर म्हणतो आपल्याकडे आज एक विशेष पाहुणे आहेत टेलिफोनवरुन आपण त्यांच्याशी संपर्क करुया. फोन लावला जातो पलिकडून उचलतो, अँकर म्हणे अमुक तमुक कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. प्रश्न विचारतो.. विशेष पाहुणा उत्तर देतो, परत प्रश्न परत उत्तर आणि पुढचा प्रश्न विचारल्यावर नेमका विशेष पाहुणा बोलायचा बंद होतो. मग अँकर आपल्याला सांगतो, "असं वाटतंय विशेष पाहुण्यांशी आपला संपर्क तुटलाय, आपण नंतर त्यांच्याकडे परत जाऊ" आणि परत जुन्या पार्टीसिपंट सोबत बोलणं सुरु होतं. तर असा विशेष म्हणून येणारा आणि अचानक संपर्क तुटणारा पाहुणा म्हणजे आपला (पराग कारखानीस) प्यॅगी.
दिवस-रात्र आय.बी.एन लोकमतवर येणारा, क्षणाक्षणाला काही ना काही सांगणारा निखिल वागळे, आपण टिव्ही बंद करायचा जरी म्हणत असलो तरी "अचूक बातमी ठाम मत, पहा फक्त आय.बी.एन लोकमत" म्हणून आय.बी.एन वर स्वतः चिकटून बसलेला आणि लोकांना चिकटायला लावणारा निखील वागळे गेले काही दिवस कुठे आहे काही पत्ता लागेना तो कालपरवा मी मराठी चॅनेलवर एका टॉक शो मधे दिसला. तर या अशा बेपत्ता वागळे सारखा आपला स्वानंद मोकाशी, एरव्ही दिवस रात्र एस्सीओई ग्रुपवर असणारा हा ईसम आजकाल सापडेनासा झालाय. देव न करो हा वागळे सारखा एखाद्या टिनपाट ग्रुपवर अॅक्टिव दिसायचा.
आपल्या प्रत्येकाच्या एरियामधे संघाची शाखा भरते. त्यात रेग्युलर मेंबर्ससोबतंच काही ईर्रेग्युलर कार्टी असतात, कधी येतात तर कधी टिवल्या बावल्या करत फिरत राहतात. शाखेत एखादे डेडीकेटेड शिक्षक असतात ज्यांना मुलं नियमीत यावी त्यांना शिस्त लागावी असं मनापासून वाटत असतं. मग ते अनियमीत मुलांकडे येताजाता चक्कर टाकतात संघाचं महत्व पटवण्यासाठी त्यांना संघाच्या कार्याची माहीती देतात, एक निःस्वार्थी स्वयंसेवक देशसेवेच्या भावनेने पंतप्रधानपदापर्यंत कसा पोहोचला याचं उदाहरण देतात. मुलांना पटलंय याची खातरजमा करुन घेतात. मुलं माना डोलवतात, काही मनापासून तर काही तोंडदेखले.. शिक्षक समाधानानं आपल्या कामाला निघून जातात, अधून मधून वेगळ्या विषयांना हात घालतात पण बरेचसे विषय देशप्रेम, भाषेची अस्मिता वगैरेशी निगडीत असतात. तर असे डेडीकेटेड शिक्षक म्हणजे आपल्या ग्रुपचे वरिष्ठ सदस्य श्रीयुत अनिरुद्ध देव.
आपला एखादा मामे, चुलत, मावस भाऊ असतो, मित्र असतो. जो कुठल्याही डिस्कशनचा शेवट उदास नोटवर करत असतो. आपण त्याच्याशी गप्पा मारल्या की तो भरभरुन बोलतो, हसतो खिदळतो पण जेव्हा आपण त्याला म्हणतो, काय मग काय चाल्लय? कसा आहेस? मग तो आपल्याला म्हणतो, "बस यार चाल्लय, भेंचोद कंपनी, टार्गेट वाट लागलीये" आपण म्हणतो अरे पण तू तर एम.बी.ए केलं होतंस ना? तसा तो पिसाळतो... म्हणतो, "आयचा घो त्या एम.बी.ए च्या, माती खाल्ली आणि आयच्या गावात एम.बी.ए. केलं यार, तुझ्या कंपनीत ओपनिंग असेल तर सांग" आणि पुढच्यावेळेस एम.बी.ए चा विषय निघेपर्यंत शांत निवांत.. परत एम.बी.ए चा विषय निघाल्यावर जीवाच्या आकांतानं शिव्यांची लाखोली वाहणारा असा मित्र म्हणजे आपला विज्या बाँड.
आणि सरतेशेवटी एकजण असा असतो जो चौकात उभा राहतो सकाळपासून. दुपारची जेवणाची वेळ झाली तरी हा तिथेच, कुणीतरी येतं आवाज देतं विचारतं काय करतोएस रे? हा म्हणतो काय नाय.. निवांते. या आपल्या मित्रापाशी गाडी थांबवून तो म्हणतो बस येऊ जाऊन जरा. कुठ? अरे चल रे टिळक रोडला जाऊन येऊ. मित्र म्हणतो अरे घरचे जेवायला थांबलेत मी फोन... त्याला मधेच तोडून हा म्हणतो चल रे नाहीतरी तुला लय महत्वाची कामं आहेत चल बस.. आपला मित्र बसतो निमूट, जातो.. सगळी कामं उरकून तो गाडीवाला याला संध्याकाळी चौकात आणून सोडतो, घरचं जेवण तसंच राहतं, हा खुशाल पान खाऊन येतो. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन करतो, कोण कोणासारखं आहे यावर जोक्स मारतो.. जमलं तर लिहितो.. काम काही नसतं सध्या त्याला.. मग घरी जातो रात्रीचं जेवण करतो, शतपावली करायला म्हणून परत चौकात येतो.. जो दिसेल त्याच्याशी गप्पा मारतो, चौकात कोण कसे नमुने दिसले हे रंगवून रंगवून सांगतो. मग एकेकजण चौकातून पाय काढता घेतो म्हणतो यार लै उशीर झालाय, सकाळी लवकर उठायचंय.. च्यायला ऑफिस परत.. तुझं बरंय.. हा हसतो, एकेकाला बाय करतो.. मंदगतीनं घरी येतो.. कडीचा आवाज न करता दार उघडतो. बेडवर पडल्या पडल्या विचार करतो च्यायला मी सगळे कसे आहेत, कोणासारखे आहेत हे ऑब्झर्वेशन केलं लिहूनही काढलं पण मी कोणासारखा आहे..? बराचवेळ विचार केल्यावर त्याला लक्षात येतं की आपण पाळीव पोपटासारखे आहोत जो येईल जे बोलेल ते टिपून आपण तेच परत सादर करतोय का? आणि नकारार्थी मान हलवतो. वेगवेगळ्या गोष्टी सुचतात पण एकही त्याच्याशी जुळत नाही.. मग त्याला जाणवतं आपण चहाच्या गाळासारखे झालो आहोत, आधी चहाच्या डब्यात, मग पातेल्यात पडून राहतो, मग गाळणीत आणि मग सिंकमधे.. जोवर कोणी आपल्याला येऊन हलवत नाही तोवर तिथेच... एखाद्याला चहाची तल्लफ येईपर्यंत आपण त्याचे मग सिंकपर्यंतचा प्रवास... असे काही बाही विचार करत झोपी जातो.. सकाळी उठून परत आवरुन चौकात हजर.. क्रिकेट, राजकारण, निवडणूक, अर्थव्यवस्था सगळ्यावर गप्पा होतात मग कोणीतरी म्हणतं काय करायचं ठरवलयेस पुढं आयुष्यात? हा चिडीचूप.. तर असा हा सध्या ऑल्वेज अॅव्हलेबल आणि या ना त्या विषयावर बोलणारा पण स्वतःला आयुष्यात काय करायचंय हे अजूनंही माहीती नसणारा तुमचा मित्र (तुम्हाला खरंतर कळलंच असेल पण तरीही फॉर्म्यालिटी म्हणून सांगतोच) म्हणजे कुणाल प्रकाश रुद्राके/कुण्या.
के पी आर









.jpg)