आजकाल त्याचं सगळं लक्ष मोबाईलमधेच असायचं. तसं पाहिलं तर त्याला फोन कोणाचेच येयचे नाहीत पण तरीही कुणीतरी खिदळल्यासारखे आवाज करत रींग वाजायची त्याच्या फोनची आणि तो हसत हसत फोनकडे बघायचा अन पटापट काही बाही टाईफ करुन परत वर बघायचा. जेवणाच्या टेबलवरही त्याच्या हातून मोबाइल सुटायचाच नाही. कधी विचार करत, कधी हसत, कधी वैतागून तो त्यात काहीतरी वाचायचा अन उजव्या हातानं जेवण थांबवून डाव्या हातानं काहीतरी टाईफ करायचा. आजूबाजूच्या कोणाचंच आणि कशाचंच त्याला भान नसायचं, आई आबांना हे असलं वागणं बिलकुल रुचत नव्हतं त्याचं. पण आता पोरगं मोठं झालंय असल्या गोष्टीमधे त्याला बोलायला नको असं वाटायचं दोघांना. काहीही असलं तरी पोरगं भानातून गेलंय हे मात्र दोघांनाही कळून चुकलं होतं.
हॉल आणि जेवणाचं टेबलंच काय घेऊन बसलात जेवण झाल्यावर त्याच्या रुममधे झोपायला गेल्यावर निम्म्या रात्रीपेक्षा जास्तवेळ याचं मोबाईल पुराण अखंड चालायचं. रात्रीच्या शांततेमधे अगदी हळू आवाजातली रींगटोन पार शेजारच्या घरातही ऐकू जायची मग घरातल्यांना न समजणं तर दूरची गोष्ट होती. मग एकदा आईनं विचारलंही त्याला की काय फालतूपणा चाललाय? कोणाला एवढी उचकी लागतेय तुझ्या नावाची निम्म्या रात्रीची सुद्धा? त्यावर त्यानं ऊत्तर दिलं होतं अगं मी तर ११ लाच झोपलो होतो, काय बोलतीएस तू?
आई: (सूचक नजरेनं त्याच्याकडे बघत) फोन सायलेंट करुन काही फायदा नाही, व्हायब्रेटर घुरघुरतो रात्रभर.
मग त्याला जाणवलं रींगटोन बंद करावी अन व्हायब्रेटर ऑन ठेवावा तर फोनचं गुरगुरणं सगळीकडेच ऐकू जायचं. नजर चुकवून त्यानं विषय बदलला आणि तेवढ्यापुरती वेळ मारुन नेली.
त्यानंतर मात्र तो फोन पूर्णपणे सायलेंट करुन ठेवू लागला, फोनला सिक्युरीटी कोड आला आणि निर्धास्तपणे तो झोपायला जाईपर्यंत फोन कुठेही पडू लागला त्याचा. रात्री मात्र फोन सायलेंट करुन मेसेज मेसेज खेळायचे ते दोघं. २-३ वाजत आले की त्याला झोप येयची, आधी झटपट रीप्लाय करणारा तो मग तीन तीन - चार चार मिनिट होईपर्यंत रीप्लाय करायचा नाही.
ती: झोपलास का?
तो: नाही नाही.. उद्या मूव्ही ला जाऊया, गेस्ट सेमिनारंच तर आहे, व्हॉट से?
आता तिचा रीप्लाय येईपर्यंत झोपी जायचाच तो पण मग तिला कळू नये म्हणून फोन बंद डोळ्यावर ठेऊन द्यायचा. तिचा रीप्लाय आल्यावर बॅकलाईट ऑन व्हायची अन त्याला जाग येयची. हा असा खेळ ती झोपी जाईपर्यंत चालायचा.
दिवस दिवस एकत्र घालवून आणि रात्रभर एसेमेस नी जागवूनही दोघांनाही नक्की माहीत नव्हतं की आपल्यात नेमकं नातं काय आहे.
आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत, की त्यापेक्षा जरा जास्तं की आपल्याला फक्त एकमेकांची सवय लागलीये खूप. सगळंच कन्फ्युजिंग होतं जाम.
तिला मी आवडतो कि ती माझ्याशी मोकळ्या मनानं फ्रि वागते खूप आणि वेगळा अर्थ आपणंच काढतोय? ती हिंट देतेय आपल्याला की आपणंच मनाचे मांडे रचतोय? कि तिनंही मनोमन हे अॅक्सेप्ट केलंय.
हां.. विचार करुन करुन त्याच्या डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली होती. त्याचं बाकी कशातंच लक्ष लागेना. ती कॉलेजला येणार नसेल तर त्याला ते ८-१० तास खूप जड जाऊ लागले, दुसरं कोणी तिच्याशी जवळीक करत असेल तर उगाचंच जेलस फिल होऊ लागलं. एक दोनदा त्यानं कॉलेज बुडवून पाहिलं, वाटलं त्याला कि ती मिस करेल आपल्याला पण तसं काहीच झालं नाही. खूप वाट पाहून पाहून त्यानंच मेसेज केला तिला अन तिचाही त्यावर जुजबी रीप्लाय. आता त्याला बिलकुलंच कळेना हे काय होतंय. त्याला आता हा सस्पेंस ब्रेक करायचा होता, बाकी सगळ्याच गोष्टी, सगळेच रीलेशन्स आता अफेक्ट होऊ लागले होते. त्याला हे बिलकुल सहन होईना, आतल्या आत त्याची घुसमट चालू होती, ना धड ईकडे ना तिकडे च्यायला लिफ्ट मधे असताना अचानक लाईट जाऊन आर्धा वरच्या न आर्धा खालच्या मजल्यावर अडकून पडावं अशी अवस्था झाली त्याची. तिच्या मनात नेमकं काय आहे हे त्याला आता माहिती करुनंच घ्यायचं होतं, हो तर हो.. आणि नाही तर... नाही.. आर या पार
त्यानंतरही बरेच दिवस त्याची विचारायची हिंमत होईना, अगदी जीभेवर आलेले शब्द मागे फिरु लागले. त्याच्या वागण्या बोलण्यात एवढा अडखळलेपणा कधीच नव्हता. एक दिवस कॉलेज सुटल्यावर त्यानं हिंमत करुन सांगितलं तिला.
तो: मला बोलायचंय तुझ्याशी.
ती: (बाकिच्या ग्रुपसोबत टवाळक्या करत) बोल ना..
तो: असं नाही.. फक्त..
ती (अजूनंही बाकिच्यांमधेच दंग.) ...
तो: मी तुझ्याशी बोलतोय.
ती: (बेफिकिरपणे) अरे हो मी सुद्धा बोलतेच आहे की. बोल ना.
तो: (जरासा वैतागून) तुला म्हणालो ना असं नाही म्हणून.
ती: (त्याच्याकडे न बघता, समोरच्या मित्राशी बोलत बोलतंच) अरे मग कसं?
त्यानं ग्रुपमधल्याच एका मित्राला विचारलं तू सोडशील का तिला जाताना? तो हो म्हणताच हा तिच्याकडे न बघता सगळ्यांना ऊद्देशून बाय म्हणून चालू लागला. ती त्याच्या पाठोपाठ आली.
ती: (काहीच न झाल्यासारखं) काय रे काय झालंय काय तुला आजकाल?
तो: (वैतागून) काही नाही, वेड लागलंय.
ती: अरे असं काय करतोएस?
तो: जा ना तू बिझी आहेस फार..
ती: तू कुठे चाललाएस पण?
मला उशिर झालाय म्हणून ती काही बोलायच्या आतंच त्यानं गाडी काढली. ती मागे बसली, तिला ड्रॉप करेपर्यंत दोघांनीही तोंडातून चकार शब्द नाही काढला. गाडीवरुन उतरताना ती फक्त त्याला सॉरी म्हणाली, तिला माहीती होतं तिनं जाणूनबुजून त्याच्या बोलण्याकडे मगाशी दुर्लक्ष केलं होतं. तो वैतागलेला असूनंही तोंडदेखलं हसत काहीही न बोलता निघून गेला.
त्यानंतर ते दोघेही एकमेकांशी जरा अंतरंच राखून वागले, बऱ्याचदा ती सगळेच लेक्चर अटेंड करु लागली. तोही काही ना काही कारणं सांगून कट्ट्यावर बसणं टाळू लागला, भेटणं टाळू लागला. पण अशा वागण्यानं प्रश्नाचं ऊत्तर मिळणार नव्हतं उलट ते दोघंही प्रश्नालाच बगल देत होते.त्याला या आधांतरी जगण्याचा कंटाळा आला होता, एक दिवस त्यानं मनाची तयारी करुन ठरवलं आज बोलायचंच. त्यानं मेसेज टाईप केला चार चारदा वाक्य शब्द चेक केले.. डिलीट केले.. परत लिहिलं.. आर्धा तास मोबाईल तसाच हातात ठेवला आणि शेवटी तिला मेसेज पाठवला.
तो: I can't take it anymore.. मला तुझ्याशी बोलायचंय. आत्ता.. इग्नोअर करु नकोस प्लिज.
ती: प्लिज आपण नंतर बोलूया? दोन आठवड्यात आपली फायनल एक्झाम आहे आणि I don't want to get in to... प्लिज समजून घे.. मी फेल होईन.
तो: तुला आयडीया आहे मी काय बोलणारे?
ती: म्हणूनंच म्हणतेय, थोडा पेशन्स ठेव. मी फेल होईन.. मला फेल नाही होयचं रे.
तो: I care a damn about exam. मला आत्ता बोलायचंय. नाही बोललो तर मी फेल होईन.
ती: ...
तो: एकतर आज नाहीतर कधीच नाही. Choice is yours.
ती: ...
निम्मी रात्र त्यानं तळमळत काढली.. मग कधी झोपी गेला ते त्यालाच कळलं नाही. पहाटे साडे तीनला तिचा मेसेज आला.
ती: बोल, एम रेडी टू हिअर..
तो खडबडून जागा झाला, त्यानं बराच वेळ विचार करुन मेसेज लिहिला..
तो: I think I have started liking you... Love, Like.. Like Love.. बराच विचार करुन शेवटी त्यानं Like लिहिलं.
ती: I knew.. तू हेच बोलणार...
तो: ?
ती: Please don't get in to this.. मला सुद्धा हिच भीती आहे.. I have started liking you too.. पण
तो: पण काय..
ती: I don't want to go beyond this.
तो: पण का? I really love you... (हिम्मत करुन शेवटी "Love" लिहिलंच त्यानं)
ती: I don't want to get in to this. We are friends & will always be. तू माझा सगळ्यात चांगला मित्र आहेस.
तो: ठिके.. मी परत हा विषय परत कधीच नाही काढणार. Promise me आपली मैत्री यानं अफेक्ट नाही होणार.
ती: Promise :)
दोन चार दिवस असेच गेले त्यानं तो विषय परत नाही काढला, साधी हिंट सुद्धा नाही. वरवर कितीही प्लेन वागला तरी त्याचं त्यालाच कळत होतं आतमधे त्याची अवस्था काय होतेय ते. मग एक दिवस कॉलेज सुटल्यावर ती म्हणाली त्याला, "चल ना मस्त कुठेतरी चक्कर मारु एक, कि तुला घरी जायची घाई आहे". ऊत्तरादाखल त्यानं बाईक चालू केली आणि तिला फक्त बसायची खूण केली. सिटीच्या ऐन मध्यवस्तीमधे एक ब्रिज होता तिथून सनसेट मस्त दिसायचा. सनसेट बघून दोघेही निघाले, गाडीवरच्या २०-२५ मिनिटांच्या प्रवासात एक चकार शब्द नाही काढला दोघांनी. त्यानं तिला घराबाहेर ड्रॉप केलं आणि निघणार एवढ्यात.
ती: थांब ना..
तो काहीही न बोलता थांबला, तिच्याकडे फक्त पाहिलं.
ती: (लाजून) असं नको ना पाहूस.
त्याची प्रश्नार्थक नजर.
ती अजूनंच लाजली, त्याच्या बाईकच्या बटनाशी खेळत त्याच्या शेजारी येऊन उभी राहिली.
तो: काsssय.
तिनं फक्त काही नाही म्हणत मान हलवली आणि हसली.
ती त्याच्याकडे बघणं टाळत होती, त्यानं बाईकला किक मारली आणि म्हणाला चल मी निघतो.
ती: (घाईगडबडीत त्याच्याकडे बघून) थांब ना रे..
त्याला तिचं विचित्र वागणं कळेना, गाडी तशीच चालू ठेऊन तिच्याकडे एकटक बघत तो बोलला.
तो: काय ते पटकन बोल ना, साडे सात वाजत आले.
तिनं परत एकदा त्याच्याकडे बघणं टाळलं, मान खाली घालून नकारार्थी हलवली, गालातल्या गालात हसली परत, मागे वळून जाऊ लागली आणि जाता जाता पाठमोरीच बाsssय म्हणाली.
ती घरात निघून गेली तरी तो तिथेच उभा होता. त्यानं गाडी बंद केली आणि तिला मेसेज पाठवला.
तो: Thanks.. Thanks a lot!
ती: पण कशासाठी..?
तो: तुला जे बोलली नाहीस ना त्यासाठी. आता होकाराचा रिप्लाय नाही केलास तरी चालेल. "I love you" :)
के.पी. आर

No comments:
Post a Comment