Friday, July 7, 2017

धोनी


धोनी... प्रिय वगैरे म्हणायचा नाटकीपणा करणार नाही रे. कारण तू मला प्रिय वगैरे नव्हतासंच कधी.
तू वन डे आणि टी-२० च्या कर्णधार पदावरुन पायऊतार झालास, बातमी ऐकली. आजवरची तुझी
वाटचाल बघता हि अशी अचानक आलेली बातमी ऐकून फारसं आश्चर्य वाटलं नाही. हे असंच
काहीसं होणार याचा अंदाज होता, म्हणजे अचानक जाहीर करणं तुझ्यासाठी नवीन नाही
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे "तू आता कर्णधारपद सोड" असं सांगायची वेळ
तू येऊ द्यायचा नाहीस असंही वाटत होतंच. तू कितीही आवडत नसलास तरी रांचीसारख्या एका छोट्याश्या ठिकाणाहून, एका सर्वसामान्य कुटुंबातून येऊन केवळ तुझ्या दुर्दम्य ईच्छाशक्ती, मनगटातली ताकद आणि स्वकर्तृत्वावर तू मिळवलेलं यश हे खूप खूपंच उत्तुंग आहे. आणि आजवर तू जे काही साध्य केलं आहेस त्यासाठी मी तुला मनापासून फक्त मानतंच नाही तर तुझा खूप रीस्पेक्ट करतो.
तू मला कधी आवडला नाहीस हे खरंय पण म्हणून तू टाकाऊ होत नाहीस, तसं तर तू कोणालाही आवडला नाहीस तरीही तू टाकाऊ होत नाहीस कारण तू कर्तृत्वानं मोठा झालायेस, कोणाच्या मानण्या न मानण्यानं त्यात तसूभरंही फरक पडू शकत नाही. तुझा अनऑर्थडॉक्स गेम, आडवे तिडवे फटके, टेक्निकल अप्रोचपेक्षा ताकदीवर भर देऊन केलेला खेळ याकडे कोणीही सहजंच दुर्लक्ष केलं असतं खरंतर पण तू टिम इंडियात आल्यापासून सिनियर प्लेयर्ससाठी रुंदावलेलं एग्झिट डोअर, चेन्नई सुपरकिंग्जच्या आणि पर्यायनं तुझ्या मर्जीतल्या खेळाडूंना मिळणाऱ्या अवाजवी संधी यामुळे तुझ्याबद्दल एक अढी तयार झाली मनात. कदाचित हे सगळे आमच्या मनाचे खेळंही असतील पण बऱ्याच प्रसंगांमध्ये सिनियर प्लेयर्स आणि तुझ्यातली दरी खूप प्रकर्षानं जाणवली आणि तू यश मिळवत असतानाही आम्ही तुझा तिरस्कार करण्यातंच धन्यता मानली.
गावठी, आंधळी कोशिंबीर फेम, आडवी ब्याट आणि काय काय म्हणून तुझ्यावर टिका केली... खरंतर तुझा राग करण्यासाठी बऱ्याचदा कारणंही शोधली. मला २००४ मधली पाकिस्तानातली तुझी धडाकेबाज खेळी अजूनंही आठवते, दुसऱ्या दिवशी द्वारकानाथ संझगिरींनी लिहिलं होतं काल सचिन आऊट झाला म्हणून ज्यांनी टिव्ही बंद केला ते खरे कर्मदरीद्री. पुण्यातल्या नेहरु स्टेडीयमवर श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमधे जेव्हा चांगली सुरुवात करुन सचिन आऊट झाला होता तेव्हा नाराज होऊन मी स्टेडीयममधे थोडावेळ झोपलोही होतो. शेवटी पंचवीस एक बॉलमध्ये आपल्याला जिंकायला अठरा रन हवे होते, तू स्ट्राईकवर होतास. आमच्या पुढच्या रांगेतल्या एकजण म्हणाला अरे तीन सिक्स मार आणि संपवून टाक च्यायला. पुढच्या बॉलवर तू सिक्स मारलीस, त्याच्या पुढच्याही आणि तिसऱ्या बॉलवरही. जणूकाही तुलाच डोक्यावर घेतलंय अशा जोशात आम्ही त्या "तीन सिक्स मार आणि संपव" म्हणणाऱ्या माणसाला अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचलो होतो. तेव्हा तू आवडायचास..खूप आवडायचास... तू कॅप्टन झालास आणि सिनियर प्लेयर्सला लागलेली गळती बघून तू आवडेनासा झालास. तू थंड डोक्याने, शांत चित्ताने खेळत राहीलास. सगळ्यांसमोर कितीही तुझ्यावर टिका केली तरी आतून तुझे हे गुण आवडले होते आपल्याला. कोणी कितीही टिका केली तरी तू तुझे संघसहकारी निवडलेस आणि सक्सेसफुल होत राहिलास. नव्यांना संधी दिलीस, भले ते तुझ्या मर्जीतले का असेनात, मैदानावर अक्षरशः जुगारंही खेळलास (पहिल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमधली जोगिंदर शर्माची लास्ट ओव्हर कोण विसरेल?) बऱ्याचदा यशस्वी झाले काहीवेळी चुकलासंही. हारलास तरी तितकाच स्थितप्रज्ञ जिंकलास तरी तितकाच, तुलाच ठाऊक कसं काय जमवलंस. टिम इंडिया असो की आय.पी.एल तू जिंकत राहीलास, मी तुझ्यावर टिका करत राहीलो. आय.पी.एल मध्ये तर तू आणि तुझे टिममेट्‌स धडाकेबाज खेळ्या करत अशक्यप्राय हा शब्दही फार छोटा वाटावा अशा मॅचेस जिंकत राहीलात. मीसुद्धा तुझा राग करतंच राहीलो, पण खरं सांगायचं ना तर तुझ्या खेळापेक्षा ते "सिनियर वर्सेस यू" या गोष्टीमुळे तो राग होता. पारंपारीक खेळ, तांत्रिकता आणि टिकाकार यांना फाट्यावर मारत तू जिंकत राहीलास, हारलास तेव्हाही पुढे चालत राहीलास, गांगुली नंतर संघाला तू जिंकण्याची खरी सवय लावलीस.
सचिन वन डेतल्या पहिल्यावहिल्या डबल सेंच्युरीच्या उंबरठ्यावर ऊभा असताना एका बाजूने तूसुद्धा फटकेबाजी चालू ठेवलीस, एक वेळ तर अशी आली की सचिनला स्ट्राईकंच मिळेना, त्यावेळी मी म्याच बघत नव्हतो पण मित्र फोनवरुन आखो देखा हाल सांगत होते. प्रत्येक बॉलगणिक मी तुला जीव खाऊन शिव्या देत होतो, सचिनची डबल सेंच्युरी तुझ्यामुळे हुकणारंच असं वाटत होतं पण नाही सचिनला स्ट्राईक मिळाली आणि त्यानं रेकॉर्ड केलं. पण मुद्दाम असं करण्याईतका मनाचा कोतेपणा तर निश्चितंच कोणत्याच नॅशनल लेवलला खेळणाऱ्या प्लेयरमध्ये नसणारंच, तू कसा काय त्याला अपवाद असशील. वरची फळी अपयशी झाली तू भयंकर संथ खेळून चाळीसेक रन काढून स्वतःची बाजू सेफ करतोस आणि शेवटी हाणामारी करुन हिरो होयला बघतोस असं वाटत राहिलं नेहमीच पण कोणत्याही परीस्थितीत थंड डोक्यानं खेळणं हे प्रत्येकालाच जमतं असं नाही... तू जमवलंस, जवळपास नेहमीच. गांगुली, सेहवागची एक्झिट, युवराज टिम बाहेर बसणं आणि जडेजा, रैना, मुरली विजयला अपयश येऊनंही संधी मिळत राहणं यामुळे उत्तरोत्तर तुझा रागंच केला मी. पण फॉर्च्युन फेवर्स द ब्रेव्ह म्हणतात ना तसं तुला नशिबानंही साथ दिली आणि तू मैदानावर तुझी धमकंही दाखवलीसंच. यश डोक्यात जाऊ न देणारा आणि अपयशंही तितक्याच शांतपणे पचवणाऱ्या धोनीवर माझ्यासारख्या कोणीही कितीही टिका करो पण वर्ल्ड क्रिकेटमध्ये तू तुझं एक अढळ स्थान निर्माण केलंस.
आजकाल तुझा खेळ पूर्वीसारखा आक्रमक राहीला नाहीये, शिव्या द्यायला आम्हाला चालूनंच आलीये संधी पण... महेंद्रसिंग धोनी आता तुझ्यावर कॅप्टंसीची जवाबदारी नाहीये, तू जसा तुझा काळ गाजवलास तसाच धडाकेबाज खेळत रहा... मला कितीही आवडत नसला तरीही पुढच्या वर्ल्डकपमध्ये धोनी संघात असावाच अशी माझी मनापासून ईच्छा आहे.
धोनी तू मला कधीच आवडला नाहीस... आजंही आवडत नाहीस... पण स्वकर्तृत्वावर तू शिखर गाठलंस, तिथे तळ ठोकलास तर आता जेव्हा कधी रीटायर होशील तेव्हा माझ्यासारख्या टिकाकारांची तोंड बंद करुन जोरदार खेळून बाहेर जावंस अशी मनापासून ईच्छा आहे... कोणाचाच पडता काळ बघायला आवडत नाही मला आणि तूही त्याला अपवाद नाहीस...
#HappyBirthdayMSD
Play Well, Enjoy Your Game!


केपी आर

Friday, June 23, 2017

लावू घोडा


चल काढू उणी दुणी
उडवू चिखल थोडा
विकासाच्या आयचा घो
जनतेलाही लावू घोडा

उभं राहू चौकात
आयला भाषण ठोकू
दुसऱ्याची चव्हाट्यावर आणू
स्वतःची मात्र झाकू

झुकून करु सलाम
हात देखील जोडू
मायला चार दिवस फक्त
मग गादीवर चढू

किंमत ठरवू पक्की
बोली लाऊ बोटाची
शे पाचशे रुपड्यात
खपाटीला गेल्या पोटाची

वाटून घेऊ रंग
हिरवे निळे भगवे
चढवू पांढरे डगले
विचार ठेऊ नागवे

तू घे मशिद
मी घेतो राम
रीकामचोट माथ्यांना
मिळू दे काम

ऐकल्यासारखं करु
थोडं रडल्यासारखं करु
पाठ थोपटतील ते
पाया पडल्यासारखं करु

विष पेरु पाडू फूट
माणसं उभ्यानं कापू
वस्त्या पेटतील रातसारी
आपण सुखानं झोपू

भाषा धर्म जात पात
अस्मितेला चढू दे धार
नरडीचा घेऊ दे घोट
अन आपल्यांवरही करु दे वार

निवडणूकीचा रंगवू फड
मतांचा बाजार मांडू
जिंकलो तर ठिकंच
नायतर म्हणू "नशिबंच गांडू"

निकालाच्या पलिकडे
मांडवली करु
गळ्यात घालू गळे
अन एकमेका साह्य करु

टेंडर बिंडर पैसा बियसा
आडवा हात मारु
ठासून भरु खिसे
च्यायला सगळ्यांचा घात करु

विकासाच्या नावाखाली
रींगणात उतरु यंदा
चुतिया बनवू एकेकाला
तेजीत चालू दे धंदा

बदल घडवायचा एकेकात
असतो रेहमानी किडा
मतदान करुन घंटा फरक पडणारे थोडा?
याला नडा त्याला फोडा
प्रश्न विचारणाऱ्याला जित्ता गाडा
होऊ दे झोकात शक्तिप्रदर्शन
जमंल तेवढा करु की राडा
अरे विकासाच्या आयचा घो
जनतेला तर लावूच घोडा

केपी आर

ह्याशट्याग माजलेत साले

ओ तुम्हीच हो हो तुम्हीच
मगाशी नाही का हाॅटेलात
खाल्लीत पावभाजी...
२० रुपयाच्या प्लेटसाठी
मोजले शे-दिडशे
चौघांचे पाच-सातशे
मग बिलाबरोबर आलेली बडीशेप
बकना भरुन खाल्लीत
तरी थोडी उरलीच मागं
आयला पैसे वसूल करायचे म्हणून
बांधून घेतलीत ती टिश्श्यू पेपरमध्ये

परवा पण नाही का
आयनाॅक्समध्ये लाह्या घेतल्यात
दोनशे रुपयांना
आणि तोटरा बसतो म्हणून
फुलपात्रभर कोक घेतलात कागदाच्या कपात
रोख दिडशे मोजून
स्ट्राॅचा फुर्र फुर्र आवाज होईस्तवर
ओढलंत जीव खाऊन कोल्ड्रींक
निघण्याआधी घासलंत कार्ड बिल भरायला
खिशात कार्डाची थप्पी नीट जपत तुम्हीच म्हणाला होता नोटाबंदीच्या वेळी
जरा सोसा की कळ देशासाठी तिच्यायला

चौकातल्या भाजीवाल्याकडं थांबून
गाडीची काच खाली केलीत बटन दाबून
म्हणलात सुकून गेलीये पार भाजी
पिशवी भरुन घेताना हक्कानं सांगितलंत
सव्वा दोनशे नाही दोनशेच देईन
शंभराच्या दोन नोटा त्याच्या हातात
कोंबून निघत असताना
रस्त्याच्या कडेला फाटक्या पुस्तकात
डोकं घालून बसलेलं त्याचं पोरगं चोरुन बघत होतं
काचा वर करुन एसीत बसलेल्या
तुमच्या पोराच्या हातातल्या खेळण्याकडं
तुम्ही गाडी चालू करता करता म्हणालात बायकोला
भाजीपाला काय महाग झालाय
बायको म्हणाली तरी तुरीसाठी
बोंब मारतायेत साले

सकाळी साडे आठ वाजता आॅफिसमध्ये पोचताच म्हणालात
ए अरे तो एसी बावीसवर कर, कोण चुत्या वाढवतं रे टेमपरेचर
संध्याकाळी कार काढताना
पंधरा सेकंद काचा खाली घेयचा सोपस्कार पार पाडत वाढवलात एसीचा ब्लोअर
पुटपुटलात स्वतःशीच काय उन्हाळाय च्यायला
रेडीओवर आरजे प्रसिद्ध क्रिमिनल लाॅ़यरला (?) विचारत होती
शेतक-यांनी संप का केलाय?
लाॅयर म्हणाला त्यांना क़र्ज़माफ़ी पाहिजे म्हणून
तुम्ही कुत्सितपणे हसून स्टेशन बदललंत
पलिकडच्या स्टेशनावर बादशाह म्हणत होता
जानूsss आज रात का सीन बना ले
तुम्ही स्टेअरींगवर ठेका धरलात

तुम्ही... झालंच तर अप्रेझलच्या मिटींगमध्ये
बसलात आडून अॅडीशनल २.५% पगारवाढीसाठी
म्हणालात, सर परवडत नाही
वर्षभर खपून काम केल्यावर फक्त ८% पगारवाढ
राजीनामा देईन म्हणालात निक्षून
वाढीव अडीच टक्के पदरात पाडून घेऊन
मग घरी आलात जेत्याच्या आविर्भावात
टिव्हीवर लावल्यात बातम्या पोट भरुन जेवण झाल्यावर
चोवीस तास बातम्यांचं दळण पाडणारं एक च्यानंल सांगत होतं
शेतक-यांच्या संपाचा आज पहिला दिवस...
बळीराजानं आक्रमक होत दूध भाजीपाला ओतला रस्त्यावर
तुम्ही डायनिंग टेबलवरची मगासची भाजीची पिशवी फ्रिजमध्ये ठेवलीत
बायकोला म्हणालात बरं झालं मगाशीच घेतली आठवडाभराची
हाॅटेलात थेटरात आॅफिसात अन झालंच तर कोप-यावरच्या फाटक्या भाजीवाल्याकडं तुमचे पैसे वसूल झाल्याचं समाधान चेह-यावर मिरवत
परत येऊन सोफ्यावर बसत
फ़ेसबुक चालू केलंत
स्टेटसमध्ये लिहिलंत
"हा खरंच संप आहे का? अन्नाची नासाडी करणारा माजोर्डा अन्नदाता असूच शकत नाही... ह्याशट्याग माजलेत साले...



केपी आर

सामान्य माणूस


यापेक्षा जास्त करुही काय शकतो सामान्य माणूस?
कपाळावरच्या शिरा तटतटेस्तोवर चिडेल
नाहीच झालं सहन तर हाताच्या मुठी आवळून घेईल जीव खाऊन
फारतर आपटेल आवळलेली मूठ, सहन होण्याईतपतंच जोरात
तरीही नाहीच गेला राग तर घालेल शिव्या कचाकचा
नाहीतर ओकेल भडभडा सगळं फ़ेसबुक ट्विटर वाॅट्सॅपवर
येणा-या कमेंट्सवर तावातावानं करेल चर्चा
रात्री पाठ टेकण्याआधी "भोकात गेले सगळे" म्हणत पंख्याचा स्पीड वाढवेल
दुस-या दिवशी उठून चालू लागेल नाकासमोर
परत शिरा तटतटेस्तोवर..

केपी आर

कल्लोळ

देव-धर्म, श्रद्धा अंधश्रद्धा
भक्ति, विश्वास
पैसा-अडका, पे पॅकेज, श्रीमंती
माणसं, पै-पाहुणे, प्रेम, माया
काही म्हणजे काहीही
माणसाचा जीव वाचवू शकत नाही
मरणानं प्रश्न सुटत नाही
आणि जगून ऊत्तरं मिळत नाहीत
जगण्या मरण्यातलं अंतर
श्वासांनी भरावं म्हटलं तरी भरत नाही
वर्षानुवर्ष जगूनंही उद्याची खात्री देऊ शकत नाही तू
शाश्वत जर असेलंच काही तर आहे फक्त मृत्यू
मरणाच्या सुन्न शांततेएवढा कर्णकर्कश्श...
जगण्याचा कल्लोळ नाही...!

केपी आर

याद है

कसमों में बंधे थे.. याद है?
कुछ तो याद होगा...
कुछ भी नहीं है तो..
अगर फिर कभी मिले तो पेहचानेंगे कैसे?
पहली बार मिले थे
तब भी तो अनजान नहीं थे
नजाने अब के मिलेंगे तो
अनजान कैसे होंगे
बतायेंगे नही
जतायेंगे नही
सिर्फ़ आँखों से छू लेंगे रुह को
वोह अनजाने, जो कभी
एक दुसरे की पेहचान हुवा करते थे
वोह जिन्हें याद तो सबकुछ है
लेकीन येह भूल गये है के
कुछ यादें न भुलायी जाती है न मिटायी
वोह दफ़्न होती है अपने साथ
देखना मेरी क़ब्र पे पौधा आयेगा... "फूलों का"
.
.
.
.
.
.
.
.
.
वो भी येही पूछेगा तुम्हें एक दिन....
"याद है"?


केपी आर

पत्ते


जहाँ पे मिला करते थे हम
इक अरसे से, वहाँ जाना छोड़ दिया है
बड़ी मुश्किल से, वही इक पेड़ के नीचे
दफना दिया था यादों को
न जाने क्यू
उसी पेड़ के शाखों से गिरते पत्ते
हवा का रुख़ भूला के
मेरे आँगन में आते है... आज भी!

केपी आर

रंग


और फिर रात के घने अंधेरे में
साफ़ दिखायी देते थे उसे रंग
दिल का पिटारा खोले
यादों के इंद्रधनुष को
सजाता था वोह आसमान पे
सितारों के बीच जगमगा उठती थी यादे
चाँद को बाहों में ले के
आसमान बीते कल से बातें किया करता था
हर रोज़ यादों का हाथ थामे
अधुरी रात उतरा करती थी दिल में
दिन का चिराग़ जल उठता था
रात के ख़्वाबों को बुझा के
आँखों में रोशनी बंजारापन सहती थी
अंधेरा होने तक
और फिर रात के घने अंधेरे में
साफ़ दिखायी देते थे उसे रंग

केपी आर
हम रातभर चाँद को ताकते रहते है
दबे पाँव अफक पे सूरज आ जाता है
नजाने क्यूँ हम चाँद को

और सूरज हमे चाहता है
------------------------------------------------------------------------------------------------------------------
हाथ से छुटे लमहों का
जाम बना के पी गये दो घूँट मे
तब से वोह खुद के साथ बैठे
अपना अकेलापन मिटाते है
------------------------------------------------------------------------------------------------------------------
देस बदलने चले थे हम
उंगली पे स्याही लगा के
दाग अच्छे है कह दिया नेताजी ने
विरोधी पार्टी से गठबंधन बना के
------------------------------------------------------------------------------------------------------------------
सबक तो जिंदगी सिखाती रही
सालों साल...
.
.
हम वैसे के वैसे रह गये
पढे लिखे "अनपढ"
------------------------------------------------------------------------------------------------------------------
आप ने हमे
अनजान बना दिया
और हम ने
आप को जिंदगी
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
मंज़िल से ज़्यादा मजा
जब सफ़र देने लगे
तो हर राह मंज़िल होती है
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
वोह समझे
वोह मजबूरी थे हमारी
और हमने उन्हे
जान बनाये रखा था
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
हम ज़िंदा तो रहते
उन्हें देख देख के
पर वोह आँखों से
क़त्ल करते रहें
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
येह चाँदनी रात और तुम...
हां... और मै....
तुम्हारे दिल के किसी कोने मे
खुद को रोशन कर के
आँखों की चाँदनी बनना चाहती हू
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
इशारे तो वोह ना समझे कभी
और दिल की बात
अल्फ़ाज़ समझाते जब तक
बड़ी देर हो गयी थी
नजाने क्यूँ जताने से ज़्यादा
बताना जरुरी था

केपी आर

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...