देव-धर्म,
श्रद्धा अंधश्रद्धा
भक्ति, विश्वास
पैसा-अडका,
पे पॅकेज, श्रीमंती
माणसं, पै-पाहुणे, प्रेम, माया
काही म्हणजे
काहीही
माणसाचा जीव
वाचवू शकत नाही
मरणानं प्रश्न
सुटत नाही
आणि जगून ऊत्तरं
मिळत नाहीत
जगण्या मरण्यातलं
अंतर
श्वासांनी भरावं
म्हटलं तरी भरत नाही
वर्षानुवर्ष
जगूनंही उद्याची खात्री देऊ शकत नाही तू
शाश्वत जर असेलंच
काही तर आहे फक्त मृत्यू
मरणाच्या सुन्न
शांततेएवढा कर्णकर्कश्श...
जगण्याचा कल्लोळ
नाही...!
केपी आर

No comments:
Post a Comment