Friday, June 23, 2017

पत्ते


जहाँ पे मिला करते थे हम
इक अरसे से, वहाँ जाना छोड़ दिया है
बड़ी मुश्किल से, वही इक पेड़ के नीचे
दफना दिया था यादों को
न जाने क्यू
उसी पेड़ के शाखों से गिरते पत्ते
हवा का रुख़ भूला के
मेरे आँगन में आते है... आज भी!

केपी आर

रंग


और फिर रात के घने अंधेरे में
साफ़ दिखायी देते थे उसे रंग
दिल का पिटारा खोले
यादों के इंद्रधनुष को
सजाता था वोह आसमान पे
सितारों के बीच जगमगा उठती थी यादे
चाँद को बाहों में ले के
आसमान बीते कल से बातें किया करता था
हर रोज़ यादों का हाथ थामे
अधुरी रात उतरा करती थी दिल में
दिन का चिराग़ जल उठता था
रात के ख़्वाबों को बुझा के
आँखों में रोशनी बंजारापन सहती थी
अंधेरा होने तक
और फिर रात के घने अंधेरे में
साफ़ दिखायी देते थे उसे रंग

केपी आर
हम रातभर चाँद को ताकते रहते है
दबे पाँव अफक पे सूरज आ जाता है
नजाने क्यूँ हम चाँद को

और सूरज हमे चाहता है
------------------------------------------------------------------------------------------------------------------
हाथ से छुटे लमहों का
जाम बना के पी गये दो घूँट मे
तब से वोह खुद के साथ बैठे
अपना अकेलापन मिटाते है
------------------------------------------------------------------------------------------------------------------
देस बदलने चले थे हम
उंगली पे स्याही लगा के
दाग अच्छे है कह दिया नेताजी ने
विरोधी पार्टी से गठबंधन बना के
------------------------------------------------------------------------------------------------------------------
सबक तो जिंदगी सिखाती रही
सालों साल...
.
.
हम वैसे के वैसे रह गये
पढे लिखे "अनपढ"
------------------------------------------------------------------------------------------------------------------
आप ने हमे
अनजान बना दिया
और हम ने
आप को जिंदगी
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
मंज़िल से ज़्यादा मजा
जब सफ़र देने लगे
तो हर राह मंज़िल होती है
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
वोह समझे
वोह मजबूरी थे हमारी
और हमने उन्हे
जान बनाये रखा था
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
हम ज़िंदा तो रहते
उन्हें देख देख के
पर वोह आँखों से
क़त्ल करते रहें
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
येह चाँदनी रात और तुम...
हां... और मै....
तुम्हारे दिल के किसी कोने मे
खुद को रोशन कर के
आँखों की चाँदनी बनना चाहती हू
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
इशारे तो वोह ना समझे कभी
और दिल की बात
अल्फ़ाज़ समझाते जब तक
बड़ी देर हो गयी थी
नजाने क्यूँ जताने से ज़्यादा
बताना जरुरी था

केपी आर

आली लहर


आम्ही लहानपणी आमच्या गल्लीत म्हणजे रस्त्यावर क्रिकेट खेळायचो. खूप मजा येयची.. कधी एका चाळीच्या घराबाहेर कंपाउंड वॉलवर स्टंप आखून किंवा लाकडाची चौकट लावून तिथे बॅट्‌समन उभा रहायचा, चाळीसमोरचं अंगण, रस्ता सोडून पलिकडे बोलर उभा रहायचा तर कधी तिरके स्टंप लाऊन पिंपळगावकरांच्या गुलमोहराच्या झाडापाशी नॉन स्ट्रायकर एंड. नंतर नंतर रस्त्याला समांतर पिच असायचं. गोसाव्यांचं घर आणि पारख्यांच्या घराच्या मधोमध लाकडी चौकट मांडून स्टंप बनवायचो, शिंद्यांच्या दारात नॉन स्ट्रायकर एंड असायचा. किमान साताठ वर्ष असं वेगवेगळ्या ठिकाणी स्टंप लाऊन क्रिकेट खेळलो. वेगवेगळ्या ठिकाणी नियम बदलत गेले कायमंच. भन्नाटंच असायचे नियम
१) रस्त्याच्या अलिकडे नो रन
२) एक टप्पा आऊट
३) रनवारी (म्हणजे रन प्रमाणे) पहिला
४) जोरात मारला तर आऊट
५) जोरात टाकला तर नो बॉल
६) ऑन साईडला नो रन
७) मग नंतर नंतर पळून नो रन... ओन्ली फोर अँड सिक्स
(चाळीतल्या सगळ्या घरांच्या कंपाउंड वॉल एका लाईनीत असायच्या)
८) समोरच्या कोणाच्याही भिंतीला डायरेक्ट बॉल लागला की सिक्स, टप्पा पडून लागला तर फोर
९) शिंद्यांच्या पत्र्यावरुन बॉल मागे गेला तर आऊट
१०) मग आडवं खेळताना, कडेकरांच्या घरापुढे किंवा पिंपळगावकरांच्या झाडापुढे पळून रन अलाऊड
११) मागे नो रन्स
१२) शिंद्यांच्या कंपाउंडमधे डायरेक्ट मारला तर दोन रन... बाकी कोणाच्याही दारात गेला तर पळून काढाल तेवढे
१३) शिंद्यांच्या घरात जो बॉल मारेल त्यानीच जाऊन आणायचा
१४) सुळ्यांच्या पत्र्यावर दोन रन
१५) चंद्रूच्या दारातल्या खांबापुढे फोर सिक्स
१६) पहिले.. झाडातून बॉल घरंगळत आला आणि कॅच घेतला तरी आऊट... मग नाय रे तो तर टप्पा असतोय... नॉट आऊट
१७) लास्ट मॅनला बॅटींग मिळायची... मग लास्ट मॅनला नो बॅटींग
१८) पवारांच्या झाडापुढे सिक्स
१९) मागच्या चाळीत मारणारा आऊट
२०) एकदा तर नासीर रन काढताना हातातून बॅट निसटून स्टंपवर पडली तरी हिट विकेट म्हणून आऊट दिला होता त्याला
फोर सिक्सच्या जागा बदलत गेल्या... एक टप्पा आऊट काळाच्या पडद्याआड गेलं... पळून रन काढायचे नियम बदलले.... वाईड देणं न देण्यावर वाद झाले... दोन रन डिक्लेअर करायच्या जागा बदलल्या... हळूहळू रस्त्यावर क्रिकेट खेळणं सुद्धा बंद झालं. आता तिथं चालतासुद्धा येणार नाही एवढी गाड्यांची गर्दी असते.
पण मूळ मुद्दा काय तर खेळाचे नियम कायम बदलत राहीले... पण किमान दोन-चार महिने तरी एक नियम कायम असायचा... आजूबाजूच्या परिस्थितीनुसार नियमात बऱ्याच काळानं बदल होयचे... कोणाला तरी हुक्की आली आणि रातोरात नियम बदलला काल पर्यंत पत्र्यावर मारल्यावर सिक्स आणि आज अचानक पत्र्यावर मारल्यावर आऊट असं नाही झालं कधी... झाडाच्या अलिकडे कोणी पळून रन नाही काढले...रनवारी पहिला असताना कमी रन करणाऱ्याला पहिली बॅटींग नाही मिळाली आणि सहा ओव्हरची मॅच असताना अचानक तिसऱ्या ओव्हरनंतर कोण असं नाही म्हणालं की आता ही शेवटची ओव्हर, काय रन करायचे ते या ओव्हरमधे कराल तर जिंकलात नाहीतर हारलात...
मॅच चालू झाल्यापासून मॅच संपेपर्यंत तरी कोणी नियम बदलले नाहीत... सगळ्यांना नियम सारखे... एकसमान... कोणीही शब्द फिरवला नाही...
आयला नोटाबंदीपेक्षा तर आमचं गल्लीतलं क्रिकेट चांगलं होतं
साताठ वर्षात जेवढे नियम आम्ही गल्लीत क्रिकेट खेळताना बदलले त्याच्या हजारपट नियम दिड महिन्यात या सरकारनं नोटांबद्दल बदललेत...
खेळणं बंद होऊन आता किमान अठरा एकोणीस वर्ष झाली पण नियम तसेच्या तसे आठवतात कारण आली हुक्की मारली बुक्की या न्यायानं नियम कधी बनवले किंवा बदललेही नाहीत... नोटांचे सगळे नियम एका दमात सांगूही नाही शकणार आत्ता विचारलंत तरी.
अजून एक विशेष म्हणजे आम्ही कधी लकी ड्रॉ काढून विजेता नाही ठरवला... काये ना सगळ्यांना माहीती होतं की आपण गल्लीत का असेना "क्रिकेट" खेळतोय "लॉटरी" नाही...
मित्रों... इथंतर सगळं "आली लहरंच" आहे...


केपी आर

बाहुबली



बाहुबलीवर बोलणं अनिवार्य: बातमी
व्हूश्श्श्श्श.... व्हूश्श्श्श्श...व्हूश्श्श्श्श.... व्हूश्श्श्श्श...
आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार माननीय पंतप्रधानांनी आज सकाळच्या मंकी बातमध्ये रेडीओवरुन देशवासियांना दिलेल्या संदेशात बाहुबली सिनेमाबद्दल सर्वांनी बोलणं अनिवार्य असल्याचं सांगितलं आहे. शाहरुख, सलमान, आमिर या तिन्ही आघाडीच्या मुसलमान हिरोंच्या आजवरच्या कोणत्याही सिनेमानं जेवढी कमाई केली नसेल त्याच्या कैकपट कमाईचे उच्चांक बाहुबलीने पहिल्या तीन दिवसातंच प्रस्थापित केले आहेत. यावरुन हेच सिद्ध होतंय म्हणे की हिंदू देव-देवतांवर विनोद न करताही सिनेमा हिट करता येतो. राष्ट्रीय एकात्मतेच्या आणि राष्ट्रप्रेमाच्या दृष्टीने हा एकूणंच खूप महत्वाचा निर्णय असल्याने आज मंकी बातचा पूर्वनियोजित कार्यक्रम नसूनंही पंतप्रधानांनी तातडीने त्यांच्या वेळापत्रकात बदल करुन व रेडीओवरचे बाकीचे कार्यक्रम रद्द करुन मंकी बात केली आहे. दरम्यान पंतप्रधानांच्या मंकी बातचा आजचा भाग संपण्याआधीच देशवासीयांनी त्यांच्या नव्या नियमाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असून जागतिक स्तरावर ट्विटरवर ह्याशट्याग मंकी बात ह्याशट्याग बाहुबली व ह्याशट्याग जै माहेश्मती या ट्रेंड्‌सनी जोर धरलेला दिसून येऊ लागला आहे.
आजच्या मंकी बातमधे माननीय पंतप्रधानांनी मांडलेले काही विषेश मुद्दे खालील प्रमाणे
१) मित्रो.....
२) आज रात १२ बजे के बाद बाहुबली के बारे मे बात करना अनिवार्य होगा
३) बाहुबली के बारे मे बात या चर्चा करने के लिये बाहुबली फिल्म देखना अनिवार्य नही है
४) बाहुबली येह पहली ऐसी हिंदुस्तानी फिल्म है जो पुरे विश्व मे छा गयी है
५) आज के बाद हर सोशल मिडिया ईस्तेमाल करनेवाले हिंदुस्तानी को बाहुबली के बारे मे प्रति दिन कम से कम चार पोस्ट्‌स करना अनिवार्य होगा और वॉट्‌सॅप ईस्तेमाल करनेवालों को हर ग्रुप मे बाहुबली के बारे मे पोस्ट्‌स शेअर करना मँडेटरी हो गया है.
६) बाहुबली के बारे मे किये गये किसी भी पोस्ट को कोई भी नजरअंमदाज नही कर सकेगा. ऐसे पोस्ट पे कमेंट करना सांवैधानिक रुप से जरुरी होगा और कमेंट सिर्फ और सिर्फ शब्दों मे करना अनिवार्य है, बाहुबली के पोस्ट्‌स के उपर किसी भी तरह के ईमोजी ईस्तेमाल करने की अनुमति नही दी जायेगी.
७) बाहुबली येह कोई काल्पनिक कथा नही है बल्की रामायण मे भी बाहुबली का जिक्र पाया गया है
८) आखरी और महत्वपूर्ण बात येह है की बाहुबली के बारे मे बात करने के लिये फिल्मों के बारे मे जानकारी या फिल्मों का ज्ञान होना अनिवार्य नही है
९) जै माहेश्मती, जै हिंद
पंतप्रधानांच्या मंकी बात कार्यक्रमातील संदेशाच्या निमित्तानं आमच्या प्रतिनिधींनी देशतल्या काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
अर्णब गोस्वामी: द नेशन वाँट्‌स टू नो...
आमचे प्रतिनिधी: सॉरी सर पण आता तुम्ही त्या च्यानेलचे भाग नाहीत
अर्णब गोस्वामी: अं... हंम्म्म नसेना का पण नेशन स्टील वाँट्‌स टू नो म्हणून माझ्याकडे आलात ना तुम्ही
अर्णबजी म्हणाले व्हूश्श.... द नेशन स्टील वाँट्‌स टू नो... व्हूश्श्श नेशन स्टील वाँट्‌स टू नो.... व्हूश्श्श्श नेशन स्टील वाँट्‌स टू नो
मोहन भागवत: सर्वप्रथम मी माननीय पंतप्रधानांच्या धाडसी निर्णयाचं स्वागत करतो. बाहुबली हि काल्पनिक कथा नसून ईसवीसनपूर्व ११०२ साली बाहुबली नामक हिंदू राजा होऊन गेला. अर्थात त्या काळात दुसरा कोणताच धर्म अस्तित्वातंच नव्हता. रामायण महाभारतातही बाहुबलीचा काही अंशी संदर्भ आढळतो, रामायणातला सुग्रीवांचे बंधू बली तसेच महाभारतातल्या भगवान श्रीकृष्णांचे बंधू बलराम यांचाच अवतार म्हणजे बाहुबली हे फार कमी लोकांना आजतागायत माहिती आहे. आणि अशा देवावतरावरचा सिनेमा असल्यानंच न भूतो न भविष्यती यश संपादन करुन बाहुबली सिनेमानं कमाईचा कधीही मोडला जाणार नाही असा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. आम्ही तुमच्या माध्यमातून हिंदू जनतेला आवाहन करतो की प्रत्येकानं आपापल्या परीनं बाहुबलीबद्दल चर्चा तर करावीच पण हा सिनेमा प्रत्येक हिंदूने किमान दोन ते तीन वेळा सिनेमागृहात जाऊन बघावा. जै हिंद जै माहेश्मति
देवेंद्र फडणवीस: अध्यक्ष महोदय.... भारतात रहायचं असेल तर जै माहेश्मति म्हणावंच लागेल.
प्रकाश जावडेकर: प्राथमिक शाळांमध्ये ईयत्ता पहिली ते चौथी दिग्दर्शक राजमौलींचा ईतिहास समाविष्ट करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु. पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा आम्ही जोर लावून मांडू, ज्या विरोधकांचं देशावर खरं प्रेम आहे ते या मुद्यावर सरकारला बिनशर्त पाठींबा देतील अशी आशा आहे.
नारायण राणे: हे बघा या देशात कोणी खरा बाहुबली असेल तर तो मी आहे आणि आम्ही जै माहेश्मति म्हणणार नाही. जै कोकण जै कोकणी माणूस
राज ठाकरे: तो शाहरुख आला होता माझ्याकडे, मी म्हणालो मला नाही भेटायचं. च्यायला तुम्ही पाकिस्तान्यांना पिक्चरमध्ये घेणार.... (साहेब प्रतिक्रीया बाहुबलीबद्दल देयचीये रईसबद्दल नाही.)
थोडसं सावरुन बसत राज ठाकरे पुन्हा: ए ते मगासचं डिलीट कर रे. हा रेडी...? तर च्यायला या परप्रांतियांनासुद्धा कळू दे बाहुबली हा मूळचा मराठी माणूस. बळी राजा, झालंच तर गेला बाजार भुजबळही मराठीच... आणि च्यायला महाराष्ट्रात रहायचं तर बाहुबलीबद्दल चर्चा करावीच लागेल आणि मराठीचा मान हा राखावाच लागेल. जै महाराष्ट्र जै माहेश्मति
उद्धव ठाकरे: "बाळा"साहेब एकंच होते... शिवसेनेतून बाहेर गेलेल्यांचे काय हाल होतात ते अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. तेव्हा कोणत्याही नारोबानं आम्हाला शिकवू नये महाराष्ट्राचा खरा बाहुबली कोण ते... एक बाळासाहेब आणि एकंच बाहुबली तो म्हणजे शिवसेनाचा ढाण्या वाघ... जै माहेश्मति जै महाराष्ट्र
रामदास आठवले: दिग्दर्शक होतात लाख... दिग्दर्शक... होतात लाख पण लाखात एकंच असतो राजमौली... ज्याच्यासाठी ही ज्ञानपीठ विजेती कविता केली तो फक्त एकमेव बाहुबली... जै माहेश्मति
छगन भुजबळ: अरे मला तर ईतकी वर्ष लागली त्या राजमौलीनं एका आठवड्यात कमवले की रे, त्याची कोणीतरी चौकशी करा... किमान बाहुबली बघण्यासाठी तरी सोडा रे... जै माहेश्मति
अरविंद केजरीवाल: सब मिले हुये है जी... येह बाहुबली मे किसका पैसा लगा है येह सब जानते है... शीला दिक्षितजी से ले के अंबानी अदानी, यहा तक के मोदीजी का भी पैसा दाव पे लगा है.. यूँही कोई बाहुबली की चर्चा करना अनिवार्य नही करता...लेकीन हम भी व्हाईट मनी से ईतनी हिट फिल्म बना के दिखायेंगे... तब तक जै माहेश्मति
राहुल गांधी: मै मोदीजी की कडी निंदा करता हू.... अगर मै बोलूंगा तो भूकंप हो जायेगा... लेकीन तब तक मनमोहन अंकल मुझे वोह बाहुबलीवाला हाथी दिला दो ना प्लिज... मुझे भी प्रभास जैसा फोटोशूट करवाना है.
मनमोहन सिंग: द डिसीजन टू मेक डिस्कशन्स ओव्हर बाहुबली मँडेटरी विल कॉज ग्रिव्हस डिस्रप्शन्स टू द कॉमन मॅन व्हू अर्न्स डेली वेजेस थ्रू कॅश. धिस ईज अ मॉन्युमेंटल मिस्मॅनेजमेंट...
मोदीजी: बाहुबली कितने ही रीकार्ड क्यूँ न तोडे लेकीन वोह मनमोहनजी का एक रीकार्ड कभी नही तोड सकता... उन के जैसा रेनकोट पहन के नहाना किसी को नही आ सकता... अबे ए क्यामेरामन उधर कहा झक मरा रहा है... मै ईधर हू. जै हिंद जै माहेश्मति
स्मृती ईराणी: बाहुबली हिंदुस्तान की शान है... ईस मे से कोई भी बात अगर झूट निकली तो मै अपना सर कलम कर के आप के कदमो मे रख दूंगी. और हा, रईस जैसी देशद्रोहियों की फिल्मे बनानेवालो को मै चुडीया उपहार मे देनेवाली हू
शरद पवार: काल मोदीजी जपान मध्ये जापनीज पिक्चर बघत होते, आज सकाळी गोव्यात गोवन शिन्मा बघत होते, मग दुपारी त्यांनी बेळगावात बाहुबली बघितला आणि आत्ता ईथे पुण्यात येऊन मंकी बातमध्ये बाहुबलीबद्दल बोल्ले... माहीत नाही आता रात्री कुठे जाणारेत.. पण यावरुन त्यांची कमिटमेंट दिसते... आता ती पिच्चरबद्दल, फिरण्याबद्दल की मंकी बातबद्दल ते विचारु नका.
अविनाश धर्माधिकारी: या सिनेमाला विरोध करणारे क्रिटीक्स रईस आला तेव्हा तोंडात मिठाची गुळणी भरुन गप्प बसले होते. आजवर प्रेक्षक आणि समीक्षकांच्या बोटचेप्या धोरणामुळेच ही परीस्थिती आलीये. हिंदूंवर टिका केलेलं ते सगळं छान मानणारी सो काॅल्ड विचारवंतांची जमात पासाळ्यातल्या बेडकाच्या छत्र्यांसारखी फोफावलीये. बाहुबलीच्या रुपात राजमौलीनं या सगळ्यांचं दुटप्पी सेक्युल्यारीज्म नागडं करुन समोर आणलंय. जै माहेश्मति
डाॅक्टर डोईफोडे (प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ): बाहुबली हा सिनेमापुरता विषय न राहता बाहुबुली झालेला आहे. आजकाल ज्याला त्याला बाहुबलीबद्दल बोलायचंय, व्यक्त होयचंय. बाहुबली बघायची ईच्छा नाही किंवा बाहुबली सिनेमा आवडला नाही म्हणणा-यांना सोशल नेटवर्कींग साईट्सवर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय. काही ठिकाणी बाहुबलीवर टिका केली म्हणून समीक्षकांवर हल्ला झाल्याच्या घटना समोर येत आहेत तर काही समीक्षकांना ते दुस-या धर्माचे असल्यानं त्यांनी बीहुबलीवर टिका केली अाहे असे आरोप केल्याची उदाहरणं बघायला मिळत आहेत. याउपर एका समीक्षकाने बाहुबलीमध्ये फक्त हिंदू धर्माबद्दलंच चित्रण का केलंय, बाकीच्या धर्मांचा काहीही उल्लेख केला नाहीये अशी उरफाटी टिका केलेली आहे.
यात भर म्हणून की काय आता सरकारनंही बाहुबलीवर रोज बोलणं मँडेटरी केलं आहे.
बाहुबलीचे समर्थक, विरोधक आणि बाहुबलीवर बोलणं मँडेटरी करणारं सरकार हे सगळेचजण आपापल्या सोयीनं आपल्या आर्ग्युमेंटसाठी बाहुबलीचा वापर करुन एकमेकांना आणि बाहुबलीबद्दल तटस्थ असलेल्या सामान्य जनतेला सर्वतोपरी बुली करत आहेत, त्यामुळे माझं असं स्पष्ट मत झालेलं आहे की बाहुबलीला या सर्वांनी बाहुबुली केलेलं आहे
निखिल वागळे: मंकी बात मधून वेगवेगळ्या गोष्टींची जबरदस्ती करणं हा मोदीजींना सत्तेचा चढलेला उन्माद आहे का? जो माणूस फक्त स्वतःच्या मनातलं सांगतो आणि त्याला मंकी बात म्हणून बाकी कोणालाही बोलायला संधी नाकारतो अशा माणसाला स्वार्थी म्हणू नये का? हा सिनेमाचं भगवेकरण करण्याचा डाव आहे का? या आणि अशा अनेक अपरीहार्य प्रश्नांची ऊत्तर पाहण्यासाठी बघत रहा... अं... अं... आज कोणत्या च्यानेलमध्ये आहे रे मी?
याच दरम्यान हिंदू महासभा, आरेसेस, बजरंग दल, अभाविप, अखिल भारतीय गौरक्षा समिती या आणि अशा कित्येक देशप्रेमी संघटनांनी बाहुबलीला मरणोत्तर भारतरत्न देण्याची मागणी लावून धरलेली आहे. या विषयावर वादंग झाल्यामुळे आज लोकसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं.
आमचे प्रतिनिधी या घटनेचा पाठपुरावा करुन हरेक ताजी घाडामोड तुमच्या समोर आणतंच राहतील... आता घेऊया एक छोटासा ब्रेक... कुठेही जाऊ न का बघत रहा आयच्यान नेटवर्क... ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत...
व्हूश्श्श्श्श.... व्हूश्श्श्श्श... दिग्दर्शक राजमौलींची विशेष मुलाखत...
व्हूश्श्श्श्श.... व्हूश्श्श्श्श... कॉलेजमध्ये असल्यापासून बाहुबली होतं राजमौलीचं स्वप्न... व्हूश्श्श्श्श.... व्हूश्श्श्श्श... बाहुबलीनं दिला होता दिग्दर्शक राजमौलींना दृष्टांत
व्हूश्श्श्श्श.... व्हूश्श्श्श्श... राजमौलींचा स्वप्न ते बाहुबली हा स्वप्नवत प्रवासाचा आता ईतिहासाच्या पाठ्यपुस्तकात समावेश होणार...
तूर्तास घेऊया छोटासा ब्रेक... ऊघडा कान खपा नीट...
केपी आर

लव्हलेटर

तर झालं असं की बऱ्याच वर्षापूर्वी, तरी बऱ्याच म्हणजे सतरा-अठरा... तर बऱ्याच वर्षापूर्वी माझी बालमैत्रिण आणि मी शेजारच्या साळुंख्यांच्या दारातल्या ओट्यावर गप्पा मारत बसलो होतो. ती म्हणाली कुंड्या, नेहाला लव्ह लेटर आलंय.. तर लव्ह लेटर बिटर म्हणजे त्या काळात लैच कायतरी इंटरेस्टींग, एक्सायटींग आणि जगावेगळं होतं. एरव्हीच्याच रोजच्या रटाळ, त्याच त्याच गप्पा मारता मारता मी पण ते ऐकून एकदम झपाटलेला मधल्या तात्या विंचूच्या बाहुल्यात प्राण ओतल्यागत खडबडून जागा होऊन बसलो. काय बोलतेस? कुणी? आणि कधी? हे कसलं भारीये च्यायला असल्या आवाजात वगैरे मी दोन-चार प्रश्न विचारुन टाकले...
मैत्रिण: काल.. आणि कोणी ते माहीत नाही पण आलंय तुझ्या नावानं...
मी: काय (टोन सहाजिकंच आयच्या गावात आता हे काय नवीन असा होता)
मैत्रिण: (चाचपडत) तू... तू लिहिलंयेस का?
मी: वेडीयेस का? (अंगावरचं झुरळ झटकल्याच्या अविर्भावात)
मैत्रिण: वैतागतोस काय, मी आपली शंका दूर केली. अरे कसलं विचित्र लिहिलंय माहितीये का?
मी: काय लिहिलंय?
मैत्रिणीनं तिच्या ब्यागेत ठेवलेलं लव्हलेटर बाहेर काढून माझ्या समोर नाचवलं. मग तिनं ते आधी वाचलेलं असूनंही आम्ही दोघांनी परत एकदा एकत्रित वाचलं. असलं बालिश आणि क्लिशे लव्हलेटर मी त्याआधीही कधी वाचलं नव्हतं आणि त्यानंतरही आजवर वाचलेलं नाही.
प्रिय नेहा
आपण एकमेकांना लहानपणापासून ओळखतो. तू माझी खूप चांगली मैत्रिण आहेस म्हणून समोरासमोर सांगायची कधी हिंमत नाही झाली... फलाणा ढिमका.... अमुक तमुक... बक्‌बक्‌ बक्‌बक्‌..... असं तसं वगैरे वगैरे....
शेवटी माझ्या आयुष्यातली सगळी सुखं तुला मिळू दे आणि तुझ्या आईबाबांच्या आणि तुझ्या आयुष्यातली सगळी दुःख माझ्या वाट्याला येऊ दे... मला तू कायम आवडत राहशील... प्लिज माझ्यावर रागावू नकोस.... परत वगैरे वगैरे वगैरे.... बाप रे बाप हे असलं पाचकळ पत्र मला आयुष्यात कधी लिहिता आलं नसतं... तेव्हा तर लव्हलेटर फिटर लिहायची हिंमतही नव्हती...
बरं हे असलं बेचव, पांचट पत्र लिहून त्यात माझं नाव लिहून ते पाकिटात घालून तिच्या घराच्या दाराच्या कडीमधे अडकवून कशाला झक मारायला जाणार होतो मी...? म्हणजे तिच्या आईबापाच्या हाती लागलंच तर विनासायास आपलं नाव ठळक फाँट्टमध्ये वगैरे त्यांना दिसावं हा प्लान कोण बिंडोक करणारे?
आयला हे असलं पत्र वाचल्यावर मी घायकुतीला येत दहा दहावेळा मैत्रिणीला सांगितलं म्हणजे कंन्व्हिंस करायचा प्रयत्न केला की बाई मी हे असलं वाचल्यावर मळमळेल असलं पत्र बिलकुल लिहिलेलं नाहीये. बरं नेहा कोणालाही आवडावी अशीच असली तरी मला तसं काय सुद्धा वाटत नव्हतं तिच्याबद्दल आणि च्यायला वाटत असतं तरी जवळपास रोज भेटणाऱ्या मुलीला हे असलं सखाराम गटणे टाईप साधेपणाचा ओव्हरडोस झाल्यानं, डोक्यात कसंतरी होऊन विचारांची उलटी करुन लेटर कोण लिहिल? आयला आम्ही पण लहानपणीच लपंडाव बघितला होता... त्यातलं तीन फुल्या तीन बदाम वालं माझ्या रसिक प्रेम पाखरा गुलाबी पत्रंही पाहिलं होतं... तिच्यायला त्यानंतरही हे असलं पत्र लिहिलं असतं तर नरकातंही जागा नसती मिळाली राव.
सांगायचा मुद्दा काय तर नेहालाच काय तर आयुष्यात आपण लव्हलेटर वगैरे कोणालाच नाही लिहिलं पण लिहिलंच असतं कधी तर नक्कीच रसिक प्रेम पाखराच्या तोडीचं लिहिलं असतं राव... तसलं तुझी दुःख मला आणि माझी सुखं तुला टाईप्स पाचकळ क्लिशे नसतं लिहिलं कधी... ईतकंच...

केपी आर

रोज डे


आज रोज डे आहे म्हणे...
शाळेत असताना जाम अॅट्रॅक्शन वाटायचं च्यायला रोज डे वगैरे प्रकाराचं. शाळेतून घरी येताना नीलायमचा पूल चढून आल्यावर दमायचो मग पाच-दहा मिनिट पूलावरच्या चिंचेच्या झाडाखाली थांबायचो. दमल्यामुळे थांबण्यापेक्षा खरंतर रेणूका आणि नू.म.वि.च्या मुली दमून तिथे स्टॉप घ्यायच्या, वॉटरबॅगमधलं पाणी प्यायच्या म्हणून आम्ही तिथं थांबायचो. अमुक एस्पी कॉलेजचा रोज किंग झाला अमुक रोज क्वीन झाली वगैरे गोष्टींची चर्चा चालायची आणि त्यात प्रत्येकजण ईतका हिरीरीनं भाग घ्यायचा आणि मसाला लाऊन लाऊन सांगायचा की जसं काय च्यायला स्वतः भावे हायस्कूलमध्ये नव्वी दहावीमध्ये नसून एस्पीला एफ्वाय जेसीलाचे. बरं ही अति महत्वाची गहन चर्चा चालू असताना रेणूका असो की नू.म.वि. असो दोन्हीपैकी कोणत्याही शाळेतली मैत्रिण फक्त ओळख दाखवून जरी गेली तरी आपला भाव वधारायचा. शाळेत असूनंही एस्पी कॉलेजची रोहिणी कालच्या रोज डेला रोज क्वीन झाली हे आख्ख्या जनतेला माहीत असायाचं, बर नुसतं नाव नाही बरं का तर रोहिणी कोण ए तेही अगदी तंतोतंत माहीतंच असायचं. प्रत्येकजण एस्पी कॉलेजसमोरुन जाताना पुढच्या दोनेक वर्षात ईथं अॅमडमिशन घेयचं आणि रोहिणीला रोज डेला रोज द्यायचा वगैरे स्वप्नं दिवसा ढवळ्या बघायचा, रोहिणी नाही तर किमान गेला बाजार आपल्याला चौथीपासून आवडत आलेल्या आपल्या बालमैत्रिणीला तरी रोज द्यायचाच असा विचार करत सायकलचा स्पीड कमी करुन आपसूकंच शाळेत ऊशिरा पोहोचायचा. स्वप्नात रमायचे दिवस होते ते सगळे पण दहावी झालो आणि डिप्लोमाला अॅिडमिशन घेतलं आणि एस्पीला शिकायचं (म्हणजे बाकीचे धंदे करायचं) आमचं स्वप्नं आजपर्यंत स्वप्नंच राहीलं. नाही म्हणायला डिप्लोमाचं अॅकडमिशन होईपर्यंत दोन-तीन आठवडे तेवढा मी एस्पीचा कागदोपत्री विद्यार्थी होतो पण पहिले दोन आठवडे कॉलेजच्या जिमला मोठ्या ऊत्साहात लावलेली हजेरी सोडता मी एस्पीला विद्यार्थी म्हणून कधीच गेलो नाही. आमचे रोज असेच न घेताच सुकुन गेले.

डिप्लोमा कॉलेज म्हणजे तर एक्स्टेंडेड शाळा होती आणि त्यात आम्ही मेकॅनिकल निवडलेलं.. च्यायला मेकॅनिकल म्हणजे साला पोरींच्या नावानी ठण्‌ठण गोपाळ पाक दुष्काळंच.... डिप्लोमा, इंजिनिअरींग सगळं सिंहगडावरंच झालं आमचं. डिग्रीला मात्र एक पोरगी आली होती आमच्या कॉलेजला जिला तिच्या पहिल्याच दिवशी कॅफेसमोरच्या पायऱ्यांवर नाव विचारु विचारु भंडावून सोडलेलं आम्ही. तिच ती कुवेतवरुन आलेली समरीन आवडलेली मला. दोन चार महिन्यात च्यायला रोज डे का नाही यावा आणि पोरांनी मला फुगवला समरीनला रोज द्यायचा हा कुण्या... बरं मलाही द्यायचाच होता पण डेरींग कोण करणार च्यायला... बरं डेरींग लाख करु आपण पन तेच्यायला अॅयक्सेप्ट नाय केला तर ईज्जत का फालुदाच की पाक सगळ्यांसमोर. बर आपण फुशारक्या मारायला पटाईत, च्यायला मोटमोट्या बाता हानून झालेल्या असताना, समरीन बरोबर पाच-दहा वेळा बोलून झालेलं असताना आता आपण दिलेला रोज तिनं नाही घेतला आणि सगळ्यांसमोर आपल्याला हाsssssड म्हणाली तर काय... आयला पण रोज नाय द्यायला जावं तर अजूनंच नामुष्की... बरं अशावेळेस मित्र लै उदार वगैरे होतात, रेड रोज आणून देणाऱ्यांची संख्या काय कमी नव्हती. हो नाही हो नाही करत मी आपला एका मित्राकडून पार दुपारी तिन-साडे तीनला एक रेड रोज घेतला, जाऊ का नको जाऊ का नको करत कॅफेपाशी घुटमळलो, पोरं म्हणली जा बे च्यायला म्हणे मी रोज देणार. आता मला पण चेव चढला पण च्यायला ग्यारंटी अशी होती की ती रोज घेणार नाही, किमान रेड तर घेणारंच्च्च्च्च्च्च नाही. मग एका मित्राकडून येल्लो रोज घेतला, गौरव लगेच म्हणाला ह्याट तेच्यायला येल्लो बिल्लो नाही, रेडंच द्यायचा. मी म्हणलो च्यायला आधी येल्लो देतो, अंदाज तर घिऊ दे रे... ह्याट रेडंच म्हणून गौऱ्यानी मला रेटला. आपण शारुकचे फ्यान, मोठा सोत्ता शारुक असल्यागत ब्लेजर आणि मानेच्या मधे रेड रोज ठेवला, येल्लो रोज उजव्या हाताच्या मुठीत झाकून त्याचा देठ ब्लेजरच्या बाहीत घालून रोजसोबत जीव मुठीत घेऊन चालू लागलो. तळहाताला घाम येऊन आता पार रोज ओला होयची वेळ आली. जमेल तेवढा सावकाश मी "रीक्वेस्ट अ साँग" हॉलमध्ये आलो. समरीन तिच्या कोणत्यातरी मित्राबरोबर तितंच होती. आयला रोज द्यायचा प्रयत्नंच नाही केला म्हणून ईज्जतीचा फालूदा होण्यापेक्षा तिनं नाकारला म्हणून फालूदा होऊ दे असं ठरवून तिच्याकडं गेलो, मुठीत आणि ब्लेजरच्या बाहीत लपवलेला "येल्लो रोज" तिच्या पुढं करत म्हणालो फॉर यू... मनात म्हणलं तिच्यायला ईज्जत काढणार ही नाय म्हणून... पण ती म्हणाली व्हाय येलो रोज?
मी: फ्रेंड्‌स?
ती: बट आय गेस वुई आर फ्रेंड्‌स ऑलरेडी
आयला आता मात्र मानेमागं ब्लेजरमधे लपवलेला रेड रोज शारुकच्या स्टाईलनं काढायची वेळ आली होती. घाबरत घाबरत काढला राव तो पण रोज..
मी: देन टेक धिस
ती: व्हाय रेड रोज?
मी: कॉझ आय लाईक यू
ती: ओके...
आयला हे म्हंजे लैच स्वप्नवत वगैरे झाल्तं राव तेव्वा... घेतला होता "रेड रोज" तिनं कसलेही आढेवेढे न घेता. रेड रोज काय कोणीही कितीही जणांकडून घेतं हे आम्हाला च्यायला नंतर कळलं, पण त्यादिवशी पर्यंत तर हिंदी पिच्चरमध्ये बघून असं वाटायचं की एकाकडनंच घेत असतात.
बरं तिनं तो रोज घेतल्या घेतल्या "रीक्वेस्ट अ साँग" हॉलमध्ये मी जीवाच्या आकांतानं गौरवला शोधला कारण एकतर त्याकाळात डिजिटल क्यामेरा त्याच्याकडेच असायचा आणि त्यानी मला लै झाडावर चढवलं होतं रेडंच च्च्च्च्च्च रोज द्यायचा म्हणून... पण माझं ब्याड लक गौरव जवळपास सापडला नाही. तितक्यात पुष्कराज पाटील डिजिटल क्यामेरा घेऊन देवासारखा माझ्यासमोर आला, मी जीव खाऊन पुष्क्याला आवाज देऊन फोटो काढायला सांगितलं. परत एकदा रोज देण्याची पोझ वगैरे पुष्क्यानी दोनेक क्लिक असे सगळे सोपस्कार पार पडले. रोज घेऊन ती गेली... मी खुशीखुशीत कोणीतरी रीक्वेस्ट केलेल्या "तुझे देख के मेरी मधुबाला मेरे मन येह पागल झाला"वर दनका नाचलो. मग परत पुष्क्याला गाठलं म्हणलं भावा फोटो तर दाखव. पुष्क्यासारखा अप्रतिम कलाकार आजतागायत मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिलेला नाही. पुष्क्याने संपूर्ण समरीन, तिनं पकडलेला रेड रोज आणि तो रोज देतानाचा माझा फक्त हात असा फोटो फ्रेममध्ये क्याप्चर केला होता. बरं त्याची ही जगावेगळी कलाकारी बघून दोनंच मिनिटांपूर्वी "भावा" म्हणून हाक मारणारा मी त्याला "भ"ची बाराखडी ऐकवली, शिव्यांची लाखोली वगैरे वगैरे वगैरे वाहीली... बरं परत पोज बिज घेऊन फोटो काढावा म्हणलं तर ती गायब झालेली...

तेच्यायला लहानपणापास्नं घोकलेला रोज डेचा ईस्कुट झाल्ता...
पण ते काय एवढं महत्वाचं नाही...
महत्वाचं हे आहे की माझं लहानपणापास्नं जिच्यावर क्रश होतं तिला मी माझा मोबाईल नंबर पैल्यांदा दिला होता तेव्हा तिनी मला त्या रात्री पहिलाच एसेमेस केल्ता...
"ए रोज फॉर दोज जिन्हे मिलते नही हम रोज लेकीन याद करते है हर रोज.... गुड
नाईट"
आणि ते स्वल्पविराम, आणि वेगवेगळी चिन्ह बिन्ह वापरुन तयार केलेलं गुलाबाचं चित्र...
आत्ता लै क्लिशे बिशे वाटतं ना च्यायला... पण तेव्वा लै लै पेश्शल होतं..
रोज डे नसूनंही तोच आजवरचा बेस्ट रोज डे....!
ईतकंच...


केपी आर

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...