बेडवर पडल्या पडल्या त्यानं
मोबाईलवरच्या घड्याळात पाहिलं
"सव्वा
अकरा"... नेहमीचीच वेळ होती
त्यानं तिला मेसेज
करण्याची..
तिच्या नुसत्या विचारानंही तो
सुखावला..
एक छानसा रोमँटिक एसेमेस
तिला पाठववून तो
गालातल्या गालात हसला...
अंगावरुन मोरपिस फिरवावं तसं
कि स्वतःच एक
मोरपिस झाल्यासारखं..
हलकं हलकं...
नेमकं कसं वाटत
होतं...
अहं त्या फिलींग्ज
शब्दात सांगणं अशक्यच..
तीनदा मोबाईल चेक करुन
झाला होता, तिला
मेसेज पाठवल्यापासून..
पण आज तिचा
रीप्लाय नाही आला
डिलीव्हरी रीपोर्ट ऑन करुन
परत तोच मेसेज
पाठवला त्याने..
दुसरा, तिसरा.. आर्धा तास
झाला पण... "नो
रीप्लाय"
क्षणा क्षणाला बेचैनी वाढत
होती त्याची..
"काय झालं, रागावलीएस? अहं..
झोपलात वाटतं.. ना.. आज
काय विशेष..."
छ्या... दोन चार
पर्स्नलाईज्ड मेसेज टाईप करुन
परत डिलीट केले
त्याने..
सहसा असं होतं
नसे..
त्याच्या रोमँटिक मेसेजला तेव्हढाच
रोमँटिक रीप्लाय येयचा तिचा...
फॉरवर्डेड मेसेजेस वरुन गाडी
पर्स्नल मेसेजेसकडे कधी वळायची
ते कळायचंही नाही
दोघांना...
पर्स्नलाज्ड
मेसेजेस मग "सूचक" व्हायचे..
त्यालाही कळून चुकायचं
अन तिलाही..
"वुई लव्ह ईच
आदर" पण व्यक्त
कधीच केलं नाही...
"कोणीच.."
अन त्या क्षणाचं
फिलींग ती जादू
काही औरच होती...
अलिखीत, अव्यक्त.. बेभान, बुधुंद
सारं..
ती समोर नसूनही
ती समोर असल्याचा
भास व्हायचा त्याला..
घड्याळातल्या
बाराच्या ठोक्यांनी तो भानावर
आला..
हो नाही, हो नाही
करत... हिम्मत एकवटून त्यानं
एवढ्या रात्री फोन केला..
"हाय,
बरं झालं तू
फोन केलास.. तुला
एक गूड न्यूज
द्यायची होती"
पलिकडून आवाज तिचा
त्याच्या मनात शंकेची
पाल चुकचुकली
गुलाबी वातावरण, मोरपिस.. हसू
सगळं सगळं विरलं
क्षणात..
ऐकतोएस ना? तिच्या
प्रश्नानं भानावर आला तो..
अं.. हो.. काSSय.. लग्न
ठरलं की काय,
हा??? उगाचंच चेष्टा
केल्यासारखा बोलला तो..
काय रे कसं
काय ओळखलंस तू..
मला सांगायचं होतं
ना तुला.. लाडेलाडे
चिडून म्हणाली ती..
तू चेष्टा तर करत
नाहीसं ना? सारं
बळ एकवटून विचारलं
त्यानं
चार चारदा खात्री करुन
घेतली ती चेष्टा
करत नसल्याची
ती अखंड बोलत
होती, मुलगा कुठलाय,
काय करतो, लग्न
कधी आहे अन
काय काय
पण त्याचं लक्ष नव्हतं..
गृहितंच धरलं होतं
आपण ती फक्त
माझीच आहे.. किमान
मला न सांगता
निर्णय घेणार नाही कुठला..
तिच्या अॅक्शन्सही
तशाच होत्या, तिचंही
प्रेम होतं ना
माझ्यावर..
मीच उशिर केला
कि.. नाही नाही
तिनं चान्स दिलाच
नाही मला.. स्वतःचीच
समजूत काढत होता
तो..
तिचं बोलून झालं, त्यानं
ऐकलं न ऐकलं
कुणास ठाऊक...
दोन मिनिट विचित्र शांतता
दोन्हीही बाजूला.. अन..
कसंनुसं हसत म्हणाला
तो..
"काँग्रॅट्स...
चल मी ठेवतो"
तिनं थँक्स म्हणेपर्यंत तिला
ऐकू आलं "क्लिक"
.
.
या कुशीवरुन त्या अन
परत परत तेच...
ज्या विचारांनी सुखावला होता
तो..
तेच विचार आता काळजावर
सुरी चालवत होते..
ती दुसऱ्या कोणाचीतरी.. ह्यॅ
अशक्य..
मित्रापलिकडे
आपल्यात काही पाहिलंच
नाही तिने.. साला
आपलाच गैरसमज झाला..
मनापासून वाटत होतं
त्याला हि चेष्टा
असावी..
न रहावून पुन्हा मेसेज
टाईप केला त्याने,
"तू चेष्टा करत नाहीस
ना???? मग आपल्यात
जे काही होतं
त्याला काय नाव
देणार"
सेंड चं बटन
दाबणार ईतक्यात...
मेसेज आला... तिचाच
अन मी चेष्टा
करत असेन तर?
जरी मला माहितीये
तुला मनापासून वाटतय
हि चेष्टा असावी..
पण..
सोड ना... नाही करते
मी चेष्टा...
तुला वेळ दिला
होता मी.. सुचवलं
पण कित्येकदा..
पण तू बोललाच
नाहीस कधी.. वाटलं
माझाच गैरसमज होतोय..
तुझ्या आयुष्यातून जायच्या आधी
एकदा तरी ऐकायचं
होतं तुझ्याकडून..
पण असो..
ऑल द बेस्ट
फॉर यूअर फ्युचर..
वुई विल ऑल्वेज
बी गुड फ्रेंड्स"
.
.
"आय लव्ह यू..
आय रीअली डू..
प्लिज.." त्यानं रीप्लाय टाईप
केला..
परत डिलीट केला..."आय
विल मिस यू..."
हाह.. एक उसासा
टाकून तेही डिलीट
केलं अन एक
मेसेज सेंड केला
पटकनं..
"थँक्स
फॉर कन्फेसिंग, काँग्रॅट्स
फॉर द गूड
न्यूज... आणि
हो एक गोष्ट
लक्षात राहिल आयुष्यभर...
लाईफ डजंट गिव्ह
यू सेकंड चान्स..."
डोळ्यातलं पाणी गालावर
जाणवण्याआधीच त्यानं बटन दाबलं...
"क्लिक.... स्विच ऑफ"
कुणाल प्रकाश रुद्राके










