तुमचं लक्ष विचलित करून चोरी करण्याची एक पद्धत असते. मागे दोनजण मिळून बँकेतून बाहेर पडलेल्या माणसाला गाठून मागून आवाज देत सांगायचे दादा शर्टवर कसलीतरी घाण पडलीये, तो माणूस चटकन मागे वळून कुठे? कुठे पडलीये असं विचारायचा;प्रतिक्षिप्त क्रिया. या दोघांपैकी एकानेच हाक मारण्याआधी पार्ले जी बिस्किट चावून तो लगदा त्या माणसाच्या शर्टवर टाकलेला असायचा. मग कुठे म्हणून विचारलं की एकजण त्याच्या खांद्याच्या मागच्या बाजूचा शर्ट पुढे ढकलत ती घाण दाखवायचा. ती घाण बघून हातातली बॅग झटक्यात खाली ठेवून शर्टावरची घाण काढण्यात दादा गुंगायचे आणि ही संधी साधून दोघातला एकजण बॅग उचलून गायब व्हायचा. शर्टावर घाण आहे असं सांगून आपलं लक्ष विचलित करून आपण हातोहात गंडवलो गेलोय हे कळेपर्यंत उशिर झालेला असायचा.
सध्या आपल्याकडे सर्रास ही पद्धत अवलंबून पब्लिकला घाऊक पद्धतीने गंडा घातला जातोय. तुम्ही म्हणाल कसा? तर समाज म्हणून किंवा एक व्यक्ति म्हणूननंही आपल्यासमोर महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत हे स्वतःला विचारून बघा.
रोजगार, शेतमालाचे भाव, शेतकर्यांच्या आत्महत्या, इंधनाचे भाव, वाढती महागाई, पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, महिलावरचे बालकांवरचे अत्याचार, आरोग्यसेवा, सुरक्षाव्यवस्था, शिक्षण, भ्रष्टाचार, संप, दंगे, प्रदूषण, भेसळ, रहदारी, भेदभाव, बालमजुरी, वाढती गुन्हेगारी, हुंडाबळी यासारखे प्रश्न रोज वाढततंच चाललेत. मोठमोठे वायदे करून सत्ता काबीज केलेले पवित्र सत्ताधीश याबद्दल चकार शब्द काढायला तयार नाहीत. प्रश्न विचारणारे एकतर कॉंग्रेसी म्हणून हिणवले जातात किंवा देशद्रोही म्हणून तरी गणले जातात. बरं ज्यांचा सरकारच्या नाकर्तेपणाला विरोध आहे तेही लोक कशावर बोलणं पसंत करतात? कशावर?
1) भिडेच्या झाडाचे आंबे
2) निरगुडकरानी भिडेची घेतलेली मुलाखत
3) संतापेक्षा मनू एक पाउल पुढे होता हे भिडेचं विधान
4) कॉंग्रेस मुसलमानांचा पक्ष आहे हे मोदींचे विधान
5) डॉक्टरने केलेलं जगन्नाथाच चेकअप
6) साबुदाणा खिचडी
7) धर्माधिकारीचं ओम = mc² विधान
8) वटपौर्णिमेवरचे पांचट जोक्स
9) प्लास्टिक बंदीवरचे किळसवाणे जोक्स
10) योगा डेवरचे पाचकळ जोक्स
आणि बरंच काही.
राजकारणी हुशार असतात ते स्वतः वादग्रस्त पण मूळ मुद्द्याला फाट्यावर मारणारी विधानं करतात किंवा इतर कोणाकडून तरी करून घेतात. आपण फेसबुकवर whatsapp वर त्याची खिल्ली उडवण्यात आणि एक दिवसाचे like मिळवण्यात धन्यता मानतो. चार दोन टाळकी हसतात वाहवा करतात आपल्याला हुरूप चढतो आपण सतत तेच करत राहतो. मध्यंतरी भिडे त्याचे आंबे याचा वीट येईस्तोवर पब्लिकने चावून चोथा केला, हिडीस जोक्स केले. आता मनूस्मृतीपेक्षा संविधान कसं श्रेष्ठ आहे याचे दाखले देण्यात आपण व्यस्त झालोत. मधेच मोदी आलू सोना वगैरे म्हणतात आपण तिकडे वळतो, संबित पात्रा टीव्हीवर काहीतरी झक मारतो आपण त्याचे Video शेअर करत बसतो. कोणीतरी अमुक एक चित्रपट संस्कृतीला मारक आहे म्हणून बरळतं आपण त्याचं खंडन करत बसतो. हिंदू मुस्लिम वगैरे बिनकामाचे वाद उकरून काढले जातात आपण त्याला बळी पडतो.
हे मुद्दे, ही विधानं हेतुपुरस्सर पेरली जातात आपण कामाचं बोलायचं सोडून यावर चर्चा, वाद प्रतिवाद, मस्करी करत राहतो. मला तरी हे सगळं त्या शर्टावर पडलेल्या कृत्रिम घाणीसारखंच वाटतं आपलं लक्ष विचलित करण्यासाठी जाणूनबुजून आपल्या शर्टावर फेकलेलं..
निवडणुका जवळ आल्यात आपल्याला विचलित करण्यासाठी अजून खूप सारी घाण फेकली जाणार आहे, आपण विचलित न होता ज्या प्रश्नांनी फरक पडतो ते प्रश्न विचारत राहिलं पाहिजे नाहीतर कधी आपल्या शर्टावर घाण टाकून आपल्याला गंडा घातला जाईल हे कळणारंही नाही
क्यू के अगर महत्त्वपूर्ण मामलों से ध्यान हटाते है तो दाग अच्छे नही है
केपी आर

No comments:
Post a Comment