Tuesday, February 19, 2013

भाषा डोळ्याची


आठवतंय..?
काहीतरी सांगायचंय म्हणून
कानांत हलकेच फुंकर मारायचास..
कानाला तुझ्या ओठांचा हळूवार स्पर्श
शहारायचे मी क्षणात..
मग घ्यायचे अंग चोरुन..
अन तू नकळत परत तेच करायचास..
मी चिमटा काढायचे मग
अन तू आव आणायचास कळवळल्याचा
मी त्यावरुन फिरवलेला हात आणि
असू दे म्हणून तू पाठीवर दिलेली थाप..
वेड्यासारखं चालायचं नाही
काहीही आपलं..
तास्नतास न बोलता एकमेकांच्या खोड्या..
त्यामधे जाणवणारा आपलेपणाचा हक्क
जवळीक आपसूकंच वाढली होती आपली
तरीही.. टेकडीवरुन सनसेट पाहताना जपलेलं अंतर
मी हातातल्या घड्याळाकडे पाहील्यावर..
“थांब ना थोडावेळ” म्हणून डोळ्यानंच बोलणारा तू
आत्ता जाऊदे.. आज नक्की बोलूया रात्री..
नाही झोपणार लवकर.. म्हणून रोजंच प्रॉमिस करणारी मी
फोनवरची कुजबूज.. रात्री अपरात्री झोपेत वाचलेले अन झोपेतंच केलेले एसेमेस
अन कधी कधी फोनवर बोलतानाही भास व्हायचा मला
तू कानांत फुंकर मारल्याचा.. मग पुन्हा तोच खेळ
अन एक दिवस अचानक.. कानाशी झुकलास अन..
हलकेच कुजबुजलास, "विल यू मॅरी मी?"
यावेळेस खरंच बोललास काहीही त्रास न देता..
पण तरीही शहारले मी.. क्षणार्धात...
तुझे डोळे नेहमीच बोलायचे.. पण
तू कधी बोलला नव्हतास..
मी फक्त हसले उत्तरादाखल
अन तू झुकलास परत कानाशी..
बघ.. आठवलं तरी शहारा येतो अंगावर...
"होकार" अजून कसा द्यायचा तूच सांग??

तुझीचं ("च" वर अंमळ जोर दिलाय.. कारण तुला समजत नाही भाषा डोळ्याची)

कुणाल प्रकाश रुद्राके

Photo by: Solar Photographers 2010

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...