न्हाई न्हाई म्हनताना ठरलं की राव
येता जात ईचारत्यात समदे
कोन हाय काय कर्ती काय तिचं नाव
मोबाईलमदला फुटू दावताना मी बी लाजतो लै
आन लांब हाय म्हनता म्हनता चालू झाली लगीन घाई
ईकडं क्येळवन तिकडं आहेर
पत्रिका, मांडववाला.. समदा येळ घराभायेर
साड्या कपडे खरेदीची घाई
सोनं नाणं खर्चाला कस्लाच तोटा न्हाई
बस्ता बांधताना जेवायची बी शुद्ध र्हात न्हाई
धा दिवसावर आलं गड्यांनो सुरु झाली लगीन घाई
लगीन झाल्यावर कुटं जानार फिरायला
ईचारत्यात समदे पन येक येत न्हाई सुचवायला
शिमला केरळ मलेशिया श्रीलंका
समद्याची चौकशी करुन बी
फायनल होईनाय काही
एखांदं बी चांगलं प्यॅकेज हाती लागत न्हाई
येकेक दिसं म्हत्वाचाय लै, चालू झालीये लगीन घाई
तेलच्या लाडू चिवडा
सैपाकाचा बी घाट केवडा
पावन्यांची वर्दळ आई भाऊंची लगबग
कामा मागनं काम अन समद्यांची दगदग
नाच गाणं देवकार्य हळदी
मेंदी बिंदी झ्याकच अगदी
घोडा बँड चौघडे सनई
घराला लाईटींग पनत्या अन समई
समदे म्हनत्यात आजवर लै घोकलं
आता कस्ली बी कसर ठीवायची न्हाई
आई भाऊंना समाधान, ताई माई खुश
भाचरांचा दंगा अन समद्यांची लगीन घाई...
चालू झालीया लगीन घाई
लकांनो येयचं बर का...कारन..
औंदा खरंच लगीन कर्नार हाय
कुणाल प्रकाश रुद्राके
(या टायमाला कवितेतली पात्र अन घटना काल्पनिक न्हाईत)
Getting married on
23 Dec 2012

No comments:
Post a Comment