Tuesday, February 19, 2013

औंदा लगीन करायचं हाय - २



औंदा लगीन करायचं हाय - २

लई झालं अन थोडं ऱ्हायलं
तरी बी व्हत न्हवतं काही
वाट बगून बगून कंटाळा आला लै
कोन कशी कवा भेटंल
लकांनो डोस्कच काम देत न्हाय
पन ठरव्ली येकंच गोश्ट
औंदा लगीन करायचं हाय

कांदा पोहे अन भेटी गाटी
आमचा बंग्ला अन तेंची ईस्टेट मोटी
नोकरी धंदा फॉरेन अन प्याकेजच्या बाता
नातं नंतर पन करु यव्व्हार आता
अन मंग आस्ल्या स्थळांना म्हनावं काय
काय बी झालं तरी औंदा लगीन करायचं हाय

माय अन बा वैतागलेत लै
वाटतं तेंना समजवून सांगावं काही
समद्यांची हुतात पन आमच्या घरचा शेर खाल्ला आसंल कोनी?
ईचार करुन करुन पाक तरास करुन घेतलाय तेंनी
ईषय येकंच येता जाता
म्हनं पुडचा उमेदवार ह्योच आता
दिसभर नुस्त स्थळं, पत्रिका, फोटू अन काय काय
तेंचा तरास कमी करन्यासाटी तरी
औंदा लगीन करायचं हाय

मित्रांची बी प्रश्न त्योच
समदं यवस्थिते पन म्हनं गोंधळ घालत आसंल ह्योच
ह्याला आनि कोनती अप्सरा हवी
रोजरोज कुटून आनायची स्थळं नवी
पत्रिका दाखवून केलीये शांति बिंती
पैल्यांदा डोस्कं खात्यात मंग सांगत्यात
योग आल्याबिगर होत न्हाई गोश्ट कोनती
भेटनं तर न्हाईच पन आजकाल वैतागून तेंचे फोन बी उचलत न्हाय
आयला समद्यांना ऊत्तर देन्यासाटी औंदा लगीन करायचं हाय

नाकी डोळी नीट बगावी
चार बूकं तरी शिकलेली असावी
घर दार पै पैका तेच्यापरीस
मानसं आमाला चांगली हवी
अशीच येक..
तेंना बी अन मला बी आवडनारी घावली हाय
तिच्या घर्च्यांना बी कसलीच हरकत न्हाय
अन म्हनूनंच तयारी करा लकांनो
औंदा लगीन करायचं हाय


कुणाल प्रकाश रुद्राके
(विशेष सूचना: या कवितेतील पात्र अन घटना पूर्णपणे काल्पनिक असून, कोणाशीही साधर्म्य आढळल्यास तो एक निव्वळ योगायोग समजावा ;) )

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...