आय विश...
डोळे भरुन येण्याआधीच
दिसावी तुला माझ्या डोळ्यातली घालमेल.
समजावस मग तू.. सारं
काही नाहीए सखे आलबेल.
"मी आहे ना..."
नजरेनंच तू खात्री द्यावी करुन.
माझा हात हाती तुझ्या
ठेवावास घट्ट धरुन
आय विश...
तरीही ओघळला डोळ्यातून
जर पारा.
तुझ्या ओंजळीत जपावास
तू तो तारा.
गालावर विसावण्याआधीच
घ्यावंस त्याला झेलून.
सव्वा लाखाची मूठ ती
अलगदंच ठेवावीस मग झाकून.
आय विश..
शब्दांविनाच ओळखावं
तू माझ्या काळजातलं वादळ.
माझ्याचं विचारांचीच
असावी काळजात तुझ्या वर्दळ.
तुझ्या एका स्पर्शानं
ग सारं मळभ हटावं.
निस्तेज या डोळ्यांना
स्वप्नाचं गाव भेटावं
आय विश..
मावळतीचा सूर्य यावा
परत उगवून.
लखलखत्या ताऱ्यामागे
काळोख जावा विरुन.
तुझ्या चेहऱ्याचा चांदवा
माझ्या ओंजळीत असावा.
तुझ्या नजरेतला चांदणसडा
माझ्या नयनी दिसावा
आय विश..
दुभंगलेल्या वाटा पुन्हा
येतील जुळून.
दुराव्याचं कुंपण आपसूक
पडेल गळून.
ओठांच्या त्या पाकळ्या
पुन्हा माझ्यासाठी हसतील.
गालावरच्या खळ्यांना
विरहाचे शाप नसतील.
आय विश..
आय विश येशील तू परत..
पण विश अशी होते का पूर्ण खरंच?
आणशील ना तू माझ्या
ओठी पुन्हा एकदा हसू...
आय विश...
या जन्मी नाहीच जमलं
गं...
पण पुढल्या जन्मी तरी
आपण फक्त एकमेकांचे असू..
आय विश..
कुणाल
No comments:
Post a Comment