Sunday, March 23, 2008

नथुराम गोडसे का बोलतोय????


नथुराम गोडसे का बोलतोय????

नथुराम गोडसे देशासाठी मेला का?
गांधीजींना मारुन तो देशाचं भलं करुन गेला का?
त्याच्या तीन गोळ्य़ांनी एक शरीर मेलं.
त्याच तीन गोळ्य़ांनी गांधीजींच्या विचारांना अजरामर केलं.
अंग झाकायला एक पंचा अन हाती काठी घेऊन सत्याग्रह कोण करतो?
एका हाकेवर जनतेला एकत्र आणणारा, देशासाठीच मरतो.(दुसऱ्याला मारुन नव्हे)
विलायतेहून शिकून आलेला वकिल, गोऱ्यांच्या विरोधात अहिंसेचे शस्त्र घेऊन ऊभा राहतो.
घरची श्रीमंती लाथाडून, एका आश्रमातून देशाच्या स्वातंत्र्याला त्याचा प्रत्येक श्वास का वाहतो?
जहाल काय नि मवाळ काय, सर्वांचेच ध्येय होते समान.
फक्त बापूच नाही, टिळक, नेताजी अन भगतही होते महान.
शिवबांच्या तलवारीची आठवण नथुरामने करुन देऊ नये.
त्या शूर वीराचं पवित्र नाव एका कटकारस्थानि खुन्याने घेऊ नये.
सत्याग्रह अहिंसा सगळं साफ झूठ आहे, हे आता नथुराम आम्हाला शिकवणार का?
सत्याग्रह, म्हणजे सत्याचा आग्रह आम्ही नथुरामच्या सांगण्यावरुन सोडणार का?
एका निशःस्त्र माणसावर गोळ्या झाडून त्यानं काय अटकेपार झॆंडा लावला?
याउपर बापूंना महान म्हणून, त्यानं मनाचा किती मोठेपणा दावला....
कोणी म्हणावं असं की, देशासाठीच जन्मणार अन देशासाठीच मरणार????
मनातंच ज्याच्या राम नाही तो कुणाला मारुन रामराज्य काय आणणार?
नथुराम गोडसे बोलतोय म्हटलं की सगळे कान टवकारुन ऐकणार.
गांधीजींवर टिका करायची एकही संधी कशी काय सोडणार????
उचलली जीभ लावली टाळ्याला,
पण ....बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही ही खरी भ्रांत आहे.
म्हणूनंच डोळे, कान, तोंड बंद.... आणि सगळे शांत आहे.
कुणाल.

8 comments:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

नथुराम गोडसेने केलेला गांधीजींचा खून हा निंद्यच, पण तो त्याने कोण्त्याही वैयक्तिक स्वार्थासाठी केलेला नव्हता हेहि लक्षात घेतले पाहिजे.

Shailendra said...

फ़ारच उत्कृष्ट कविता...
नथुराम यांचे विचार फ़ारच सिरिअसली लोकं घेतात विशेषत: हिंदुत्ववादी.

Tpsms said...

मी नथुराम गोडसे समर्थक बोलतोये
धन्यवाद
भूषण पाटिल
bhushan101990@gmail.com

Unknown said...

akhand bhartachya falni nanter pakistanatun alelya hindu kutubana bheta mag nathuramgodseni kelela golibaravar charcha karu.

Unknown said...

नथुराम गोडसे ने गांधी ला मारून देशाचं भलंच केलेला आहे.

Anonymous said...

nathuram godse amar rahe

नितीन said...

चांगल्या काव्याबद्दल धन्यवाद,
पण काव्यच नाही तर भावही पवित्र असावा, लहान होतो तेव्हा आम्हीही नथुराम नावाच्या माथेफिरूने गांधींची हत्या केली पण हा इतिहास लादलेला आहे खोल अभ्यास केल्यावर इतिहासातले बारकावे कळले नथुराम माथेफिरू नाही तर एका वृत्तपत्राचा संपादक होते.
आणि गांधींच राजकारण आता कळल्यावर नथुराम यांनी केले ते त्यावेळी आवश्यक असावे,कारण गांधी स्व-संरक्षण पण नाकारतात, नेताजींना मदत करायची सोडून त्यांनी त्यांचा विरोध केला.
आणि कोण म्हणतो कि,"दे दि हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल...."
कित्येकांनी रक्त सांडलेले आहे या मातीसाठी.
आजच्या दिवशी गांधीचे तत्व म्हणजे सीमेवरील सैन्य परत बोलावणे होय...
विचार करा दुसऱ्याने सांगितले म्हणून नाही तर स्वताच्या बुद्धीला पटेल तेच मान्य करा......

Asim said...

फारच समर्पक कविता.

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...