Wednesday, August 8, 2007

सलाम!

सलाम!


मुंबईला सलाम, मुंबईकरांना सलाम.
स्फ़ोटाचंहि राजकारंण करणाऱ्या राजकारण्यांना सलाम.
क्रूरतेला जातीय रंग देणाऱ्या नराधमांना सलाम.
मैत्रीचा हात पुढे करून पाठित खंजीर खुपसणाऱ्या मित्रराष्ट्राला सलाम.
डोळे मिटून दूध पिणाऱ्या या अमेरिकेला सलाम.
पक्षनिष्ठेच्या नावाखाली दंगे नि तोड्फ़ोड करणाऱ्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना सलाम.
मतपेटिसाठि दाढि कुरवाळणाऱ्या नि भगवं पांघरणाऱ्या धर्मनिरपेक्ष पुढाऱ्यांना सलाम.
आज या तर ऊद्या त्या पक्षात ऊड्या मारणाऱ्या स्वार्थी नेत्यांना सलाम.
प्रत्येकवेळी चांगला नेता मिळवण्याच्या वेड्या आशेनं मतदान करणाऱ्य़ा मतदाराला सलाम.
मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या सगळ्या पक्षांना सलाम.
फ़क्त पैशासाठी कायद्याची मोड्तोड करून देशद्रोह्यांसाठी लढणाऱ्या कायदेपंडितांना सलाम.
देशद्रोह्यांपुढे लाचार झालेल्या न्यायसंस्थेला सलाम.
डोळे मिटून, मूग गिळून बसण्याच्या वृत्तीला सलाम.
प्रत्येक मुद्दावर पोटतिडकिनं चर्चा करणाऱ्या सामान्य माणसाला सलाम.
चोर सोडून संन्याशाला फ़ाशी देणाऱ्या या सिस्टेमला सलाम.
न्यायासाठी तडफ़डणाऱ्या हजारो-लाखो निरपराधांना सलाम.
न्यायदानाच्या पवित्र कार्याला विलंब लावणाऱ्या न्यायदेवतेला सलाम.
अन्यायाच्या विरोधात आवाज ऊठवणाऱ्या नि अन्यायातंच पिचून मरणाऱ्या या सगळ्यांना सलाम.
चारी विश्व दारीदयात जगणाऱ्या गरीब जनतेला सलाम.
पैश्याच्या गादिवर लोळणाऱ्या धनिक मंत्र्यांना सलाम.
मेलेल्याच्याहि टाळूवरचं लोणी खाण्याच्या या प्रवृत्तीला सलाम.
दिवसेंदिवस बोथंट होत जाणाऱ्या या भावनेला सलाम.
क्षणाचाही विलंब न लावता सुरळीत होणाऱ्या कालचक्राला सलाम.
सलाम!
मुंबईला सलाम!
मुंबईकरांना सलाम!
कुणाल.


Saturday, July 14, 2007

आई-भाऊ

आई-भाऊ
तुमचं बोट धरून मी चालायला शिकलो.
बोल तुमचे ऐकून बोबडं का असेना बडबडायला शिकलो.
बोलायला तर शिकलो मी, पण नेहमी सत्य बोलावं हे तुम्ही शिकवलं मला.
स्ततःवरच्या टिकेला संयमाने सामोरं जाण्याचं बळ तुम्ही दिलं मला.
समाजात कसं वावरायचं हे तुम्हीच दाखवलं मला.
पराभवातून कसं सावरायचं हेहि तुम्हीच शिकवल मला.
यशाचं वारं डोक्यात कधीच जाऊ दिलं नाही.
सतत जिंकत असतानाही जमीनीवरचं पाऊल त्यामुळे हवेत कधीच गेलं नाही.
कठीण परिस्थितीला समर्थपणे सामोरं जायला शिकवलं.
झालेल्या चूका सुधारून परत नव्यानं जगायला शिकवलं.
हाताला धरून सारं जग दाखवलं मला.
नेहमी चांगल्या संगतीत रहावं हे तुमच्याच कॄतीतून सूचवलं मला.
कधी....... तुमच्या डोळ्यांत अश्रू असतानाही हसायला शिकवलं मला.
आई-भाऊ खऱ्या अर्थानं तुम्हीच जगायला शिकवलं मला.!!!!!

तुमचांच
कुणाल.

Friday, July 13, 2007

'काय करतोय मी?'


'काय करतोय मी?'

ना जगतोय ना मरतोय मी.

जीवनात हे नक्की काय करतोय मी.

आला दिवस फक्त भरून काढतोय मी.

सत्य परीस्थितीला सामोरं जायला का डरतोय मी.

उघड्या डोळ्यानंच जणू स्वप्नरंजन करतोय मी.

जीवनांत हे नक्की काय करतोय मी?

हाती घेतलेल्या प्रत्येक कामात हरतोय मी.

गेला काळ कवटाळून का धरतोय मी.

नियतीशी भांडतोय नि रक्ताचे अश्रू का सांडतोय मी.

जीवनांत हे नक्की काय करतोय मी?

आशा नि निराशेच्या खेळात निराशेचीच कास का धरतोय मी.

दैवापुढे शरणागती पत्करून लढायचं का विसरतोय मी.

दिवसेंदिवस अपयशाच्या गर्तेतंच का घसरतोय मी.

जीवनांत हे नक्की काय करतोय मी?

आज ना ऊद्या हे ही दिवस सरतील या आशेवरंच तग धरतोय मी.

खरंच कायमस्वरुपी काहीच नसतं, पण जीवनांत येऊ घातलेला तो सोनेरी दिवस बघण्यासाठीच जगतोय मी आणि त्यासाठीच सर्वार्थाने लढतोय मी !

जीवनांत हे नक्की काय करतोय मी?जीवनांत हे नक्की काय करतोय मी?
कुणाल.

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...